Vaishali Made Bhaisane : ‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय’, वैशाली माडेची धक्कादायक पोस्ट

Vaishali Made-Bhaisane

1/6
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची गायिका वैशाली माडे-भैसने (Vaishali Made-Bhaisane) हिने नुकतीच सोशल मीडियावर एक धक्कादायक पोस्ट लिहिली आहे.
2/6
वैशालीच्या या खळबळजनक पोस्टने चाहते देखील चिंतेत पडले आहेत. वैशालीने आपल्या जीवाला धोका असल्याची पोस्ट तिच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केली आहे.
3/6
वैशाली माडेच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चाहते आणि प्रेक्षक तिला काळजी घेण्याचा आणि सांभाळून राहण्याचा सल्ला देत आहेत.
4/6
परंतु, वैशालीने ही पोस्ट नेमकी का आणि कोणाला उद्देशून लिहिली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
5/6
वैशालीने आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की,'काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन मी याचा गौफायस्फोट करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे'. वैशालीची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
6/6
एका सर्वसामान्य घरातील मुलगी ते चित्रपट सृष्टीतील नामवंत गायिका हा वैशाली यांचा प्रवास अतिशय संघर्षाचा आहे. 'झी' वरील मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावल्यानं वैशाली यांचे महाराष्ट्रासह देशभरात चाहते आहेत. वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी देखील आहेत. (All PC : @ vaishalimadeofficial/IG)
Sponsored Links by Taboola