बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पॉश वॉर्डात कुणाची सत्ता? युती की आघाडी, कुणी बाजी मारली?

Mumbai BMC Results 2026: मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये सेलिब्रिटींचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. अनेक प्रसिद्ध कलाकार ज्या वार्डमध्ये राहतात, तेथे भाजप आणि महायुतीचे उमेदवार विजयी झाले.

Continues below advertisement

Mumbai BMC Results 2026

Continues below advertisement
1/9
16 जानेवारी 2026 रोजी महानगरपालिका निवडणुकांची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सर्वांच्याच नजरा मुंबई महानगरपालिका निवडणुकींच्या निकालाकडे होते. 15 जानेवारीला राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडतील. केवळ सामान्य, खेळाडू आणि राजकीय मंडळी नसून, सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावला.
2/9
अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, सलमान खान, सलिम खान आणि आमिर खानने देखील लोकशाहीप्रति आपली जबाबदारी पार पाडली. तसेच सर्वांना मतदान करण्याचं आवाहनही केलं. दरम्यान, कोणत्या सेलेब्सच्या वार्डात कोणत्या उमेदवाराने गुलाल उधळला? हे जाणून घेऊयात.
3/9
आमिर खान मुंबईतील वांद्रे परिसरातील पाली हिल भागात वास्तव्यास आहे. तेथे त्याचे सुंदर आणि आलिशान घर आहे. आमिर खानच्या परिवाराने महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मतदान केले. वांद्रे वेस्ट (वार्ड 101) मध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात अटीतटीची लढत होती. दरम्यान, या भागात भाजप पक्षाचा उमेदवार जिंकला.
4/9
अभिनेत्री सान्या मल्होत्रा मुंबईतील अंधेरी परिसरातील वर्सोवामध्ये राहते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिनं अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील ज्ञानकेंद्र पोलिंग बूथवर जाऊन मतदान केले होते. या भागातून भाजपचा उमेदवार निवडून आला होता.
5/9
अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्नाने सकाळी सकाळी जुहू येथील गांधी शिक्षण भवनात जाऊन मतदान केले. या वार्डात महायुतीचा उमेदवार निवडून आला.
Continues below advertisement
6/9
विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या पत्नी पल्लवी जोशी अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा पार्थेनॉन टॉवर्समध्ये राहतात. या परिसरात भाजपचा उमेदवार निवडून आला.
7/9
अभिनेता जॉन अब्राहम वांद्रे पश्चिम येथील रहिवासी आहे. येथेही भाजपचा उमेदवार निवडून आला.
8/9
तमन्ना भाटियाचे घर मुंबईतीस जुहू परिसरात आहे. तिनं वर्सोवा अंधेरी मतदारसंघात मतदान केले होते. येथे महायुतीचा उमेदवार निवडून आला.
9/9
हेमा मालिनी यांनीही भाजपचा बालेकिल्ली मानल्या जाणाऱ्या जुहू भागात मतदान केले. या भागात भाजपचा उमेदवार जिंकला.
Sponsored Links by Taboola