Mrunal Thakur : मृणाल ठाकूरचं जबरदस्त साडी कलेक्शन; स्टाईल स्टेटमेंट फॉलो करण्यासाठी 'हा' लूक आहे बेस्ट

या गुलाबी रंगाच्या रेडी टू वेअर साडीमध्ये मृणाल अतिशय सुंदर दिसतेय. ही साडी डिझायनर रिद्धी मेहरा हिच्या कलेक्शनमधून घेण्यात आली आहे. चांदीचं जरी भरतकाम असलेला लांब बाह्यांचा ब्लाउज तिच्या सौंदर्यात अधिक भर घालतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मृणाल ठाकूरची ही नेव्ही ब्लू कलरची सिल्क साडी खूपच सुंदर आहे, तिच्या बॉर्डरवर सिल्व्हर जरी वर्क करण्यात आलं आहे, ज्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसतेय.

मृणालने नेसलेली ही काळ्या रंगाची साडीही खूप सुंदर आहे, ही साडी अगदी साधी आहे पण अतिशय सोज्वळ लूक देते.
मृणाल ठाकूरची ही गुलाबी सिल्क साडीही खूप सुंदर आहे. या रुंद गोल्डन बॉर्डरच्या साडीसह मृणालने डीप गोल नेक गुलाबी ब्लाउज घातला आहे. हा लूक तिने गोल्डन ज्वेलरीने पूर्ण केला आहे.
हेव्ही एम्ब्रॉयडरी असलेली मृणालची व्हाईट कलरची साडीही अतिशय सुंदर आहे. या साडीवर पिरोजा रंगाचं वर्कही करण्यात आलं आहे. मृणालने हा लूक खूप सुंदर कॅरी केला आहे.
या लूकमध्ये मृणालने वाईन कलरची साडी नेसली आहे. हा लूक तिने डायमंड ज्वेलरीने पूर्ण केला आहे.
या लूकमध्ये मृणालने रेडी-टू-ड्रिप साडी नेसली आहे. मृणाल गुलाबी बॉर्डर असलेल्या साडीमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
या पांढऱ्या रंगाच्या ऑर्गेन्झा साडीमध्ये मृणाल खूपच सुंदर दिसत आहे, तिने राऊंड नेकचा स्ट्रॅपी ब्लाउज घातला आहे ज्यामुळे तिचा लूक अधिकच ग्लॅमरस दिसतोय.