PHOTO: नाईट सूटमध्ये दिसला मौनी रॉयचा ग्लॅमरस लूक, पाहा नवे फोटो!
टीव्ही ते बॉलीवूडपर्यंत आपल्या शानदार अभिनय आणि सौंदर्याची चुणूक सिद्ध करणारी अभिनेत्री मौनी रॉय सुरुवातीपासूनच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (photo: imouniroy/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमौनीने फार कमी वेळात इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे. ती तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत राहिली असली तरीही मौनीची इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख आहे.(photo: imouniroy/IG)
मौनी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. आता मौनी रॉयने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. या फोटोंमध्ये मौनी काळ्या रंगाचा शर्ट आणि पँट घातलेली दिसत आहे.(photo: imouniroy/IG)
या फोटोमध्ये मौनी काळ्या रंगाचा शर्ट आणि पँट घातलेली दिसत आहे. इथे ती सोफ्यावर बसून कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देत आहे.(photo: imouniroy/IG)
मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या 'ब्रह्मास्त्र'साठी चर्चेत आहे. यानंतर ती 'माया जाला' या सिंहली चित्रपटातही दिसणार आहे. (photo: imouniroy/IG)
सध्या मौनी रॉय 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. या शोमध्ये अभिनेत्री जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे.(photo: imouniroy/IG)