Mohammed Rafi Birth Anniversary : जाणून घ्या आवाजाचे 'जादूगार' मोहम्मद रफी यांच्याबद्दलच्या 'या' खास गोष्टी!
Mohammed Rafi Birth Anniversary : आवाजाचे 'जादूगार' मोहम्मद रफी यांची आज जयंती. आवाजाच्या रुपातून रफी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत. (photo:mohmmad_rafi_sahab/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमधील कोटला सुल्तान सिंह गावात झाला. एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या या अवलियाने पुढे जाऊन भारतीय संगीत क्षेत्रात आपल्या सुरेल आवाजाने साऱ्यांनाच मोहात पाडले. (photo:mohmmad_rafi_sahab/ig)
लाहोरमध्ये उस्ताद वाहिद खान यांच्याकडून रफींनी संगीताचे धडे गिरवले. त्यानंतर गुलाम अली खान यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. (photo:mohmmad_rafi_sahab/ig)
श्याम सुंदर यांनी रफींना मुंबईत बोलावलं. त्यानंतर 'सोनिये नी हिरीये नी' हे पहिलं गाणं रफींनी 'गुल बलोच' या पंजाबी सिनेमासाठी गायलं. (photo:mohmmad_rafi_sahab/ig)
1944 साली नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली 'हिन्दुस्तान के हम है पहले आप के लिए गाया' हे पहिलं हिंदी गाणं गायलं आणि नंतर असंख्य गाण्यांमधून आपल्या आवाजातली जादू त्यांनी दाखवून दिली. (photo:mohmmad_rafi_sahab/ig)