PHOTO: जाणून घ्या मानुषी छिल्लर बद्दलच्या 'या' खास गोष्टी

manushi chillar

1/5
मिस वर्ल्डचा ताज जिंकणारी मानुषी छिल्लर लवकरच रुपेरी पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे. मानुषी पृथ्वीराज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. सुपरस्टार अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पृथ्वीराज'ची रिलीज डेट आणि टीझर समोर आला आहे. मानुषी मूळची हरियाणातील झज्जरची आहे. चला तर तिच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया .
2/5
मानुषीचे गाव झज्जर जिल्ह्यातील बहादूरगड तहसीलमधील बामणोली आहे. गावात मानुषीचे वडिलोपार्जित घर असून ते बंद आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी त्यांचे कुटुंब हे घर सोडून दिल्लीत स्थायिक झाले होते. मानुषीचे कुटुंब रोहतकच्या कमल कॉलनीत बराच काळ राहत होते.
3/5
मानुषीच्या कुटुंबात, तिचे काका डॉ. दिनेश छिल्लर हे गोहाना येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत, तर तिची मावशी डॉ. उषा कटारिया या महिला वैद्यकीय महाविद्यालयाच्या त्वचा विभागाच्या एचओडी होत्या. दुसरीकडे, मानुषीचे वडील डॉ. मित्रबसू हे केंद्र सरकारच्या DRDO विभागात वैद्यकीय अधिकारी आहेत. तिची आई नीलम दिल्लीच्या सरकारी रुग्णालयात डॉक्टर आहे. मानुषी छिल्लरला तीन भावंडे आहेत. मानुषीची मोठी बहीण दिवांगना छिल्लरने एलएलबी केले आहे. भाऊ शिकत आहे.
4/5
मानुषीच्या कुटुंबाकडे 3 ते 4 एकर शेतजमीन असल्याचे गावकरी सांगतात. मानुषी मिस इंडिया झाल्यावर ती एकदा बामणोलीला आली होती, त्यादरम्यान गावकऱ्यांनी तिचे स्वागत केले.
5/5
मानुषी छिल्लर 2017 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकणारी सहावी भारतीय महिला होती. प्रियांका चोप्राने ही स्पर्धा जिंकल्यानंतर 17 वर्षांनी तिने हे विजेतेपद भारताच्या नावावर केले. मिस वर्ल्ड स्पर्धेत प्रवेश करण्यापूर्वी एमबीबीएसची विद्यार्थिनी असलेल्या मानुषीने त्याच वर्षी एप्रिलमध्ये एफबीबी फेमिना मिस हरियाणाचा किताबही जिंकला होता.
Sponsored Links by Taboola