मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी आणि राधा पाटील यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे खास फोटो!
milind gunaji
1/8
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार मिलिंद आणि राणी गुणाजी यांचा मुलगा, अभिषेक गुणाजी हा नुकताच राधा पाटील हिच्या सोबत लग्न बंधनात अडकला.
2/8
लग्नसोहळा मालवणच्या वालावल येथील मंदिरात मित्रपरिवारा सोबत पार पडला. निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर आता नवविवाहित जोड्याने मुंबई येथे जोरदार रिसेप्शन पार्टी दिली.
3/8
बॉलिवूडच्या नामांकित कलाकारांनी या रिसेप्शन पार्टीत हजेरी लावली. गुणाजी कुटुंबातर्फे केलेल्या आयोजनात सर्व COVID-संबंधित सूचनांचे पालन केले गेले होते.
4/8
बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर या भव्य रिसेप्शनला उपस्थित होते. भरपूर जल्लोष आणि उत्साहात अभिषेक व राधा यांनी आपल्या नवीन जीवनाची सुरुवात केली.
5/8
या समारंभाला अधिक आनंददायी करत जॅकी श्रॉफ, आदित्य ठाकरे, रोहित राजेंद्र पवार, रणजित पवार, गोविंद निहलानी, सतीश शहा, स्पृहा जोशी आणि सुबोध भावे यांनी उपस्थिती दिली. आनंदी जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या नव-वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देत पाहुण्यांनी निरोप घेतला.
6/8
एक दशकाहून अधिक काळ पडद्यावर राज्य करणारे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिलिंद गुणाजी, हे कुटुंबातील नवीन सदस्याचे स्वागत करण्यास आतुर आहेत. त्यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले, "राधा आमच्यासाठी सूनेपेक्षा मुलीसारखी आहे. या कुटुंबाचा एक भाग म्हणून तिचे स्वागत करण्यासाठी आमचे सर्व मित्र आणि कुटुंब खरोखरच उत्साहित आहेत.
7/8
अभिषेक हा आय.टी. अभियंता आहे, जो आता चित्रपट आणि निर्मितीच्या प्रेमात पडला होता. अभिषेकाची पत्नी राधा, हि देखील मुंबईत फार्मा क्षेत्रात काम करत आहे.
8/8
अभिषेकने अलीकडेच सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी यांच्या सोबत 'छल' हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. या लघुपटाला बर्लिन फ्लॅश फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले आहे. या व्यतिरिक्त अभिषेक व्यावसायिक जाहिरातींसाठी देखील काम करत आहे.
Published at : 23 Dec 2021 04:49 PM (IST)