Mayuri Deshmukh : हिंदी मालिकांनंतर मयुरी देशमुख पुन्हा दिसणार मराठी मालिकेत!
'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) आता तब्बल सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमयुरीने मराठीसह हिंदी मालिकेतही काम केले होते. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 'स्टार प्रवाह'वरील मालिकेतून ती कमबॅक करणार आहे.
'स्टार प्रवाह'वरील 'मन धागा धागा जोडते नवा' (Man Dhaga Dhaga Jodte Nava) ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.
मालिकेत अभिनेत्री मयुरी देशमुखची एण्ट्री होणार असून सुखदा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मयुरीच्या येण्याने आनंदी-सार्थकच्या आयुष्यातही नवं वळण येणार आहे.
मयुरी देशमुख या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्टार प्रवाहवरील मालिकेत काम करणार आहे. मयुरीने आपल्या भूमिकेबाबत बोलताना सांगितले की, जवळपास सहा वर्षांनंतर मराठी मालिका विश्वात पुनरागमन करत आहे.
. खरं सांगायचं तर खुप उत्सुकता आहे. शक्यतो भूमिकेत तोच तोच पणा येऊ नये यासाठी माझा प्रयत्न असतो. सुखदा हे पात्र अतिशय सुंदररित्या लिहिलं गेले आहे. आयुष्य भरभरुन जगणारी, बडबडी आणि अतिशय सकारात्मक अतिशय ही व्यक्तिरेखा आहे. या पात्राविषयी ऐकताक्षणीच मी प्रेमात पडले. स्टार प्रवाहसोबत काम करण्याची इच्छा देखील पूर्ण होत असल्याचे मयुरीने नमूद केले.
आता, सुखदाच्या येण्याने सार्थक-आनंदीच्या आयुष्यात काय बदल घडतील हे पुढच्या भागांमधून प्रेक्षकांना उलगडणार आहे. ही मालिका सांयकाळी 6.30 वाजता प्रसारीत होते.
मयुरी देशमुखने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. 'इमली' या स्टार प्लसवरील मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती.
या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती. मयुरीची ही भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्याशिवाय तिने 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लग्नकल्लोळ' चित्रपटात झळकली होती.
2016 मध्ये 'खुलता कळी खुलेना' या मालिकेत मानसी देशपांडे ही व्यक्तीरेखा साकारली होती.(pc:mayurideshmukhofficialll/ig)