5 सख्ख्या भावांशी होतं लग्न, सासराही ठेवतो शारीरिक संबंध; बोल्ड कंटेंट असूनही काळीज पिळवटणारी 'या' फिल्मची कहाणी!
Matrubhoomi A Nation Without Women: बॉलिवूडमध्ये आजवर अनेक सिनेमे आले, कित्येक सुपरहिट ठरले, तर कित्येक सुपरफ्लॉप...
Matrubhoomi A Nation Without Women
1/13
आज आम्ही तुम्हाला अशा एका सिनेमाबाबत सांगणार आहोत. ज्या सिनेमात तुम्हाला बोल्ड कंटेन्टचा भडिमार पाहायला मिळेल. पण, या सिनेमाची कहाणी तुमचं काळीज पिळवटून ठेवेल.
2/13
या सिनेमाचा विषय अगदी वेगळा, एका गावातील अनिष्ठ रुढी, प्रथा-परंपरांवर आहे. हा विषय एवढा धाडसी आहे की, तो तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. सिनेमात एका मुलीचं पाच सख्ख्या भावांशी लग्न होतं. पण, सासरी आल्यावर तिला अनेक भयावह अनुभव येतात.
3/13
सख्ख्या भावांच्या सर्व गरजांसोबत तिला शारीरिक गरजाही भागवाव्या लागतात. एवढंच काय तर, तिचा सासराही तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवतो. पण, ज्यावेळी ती गरोदर राहते, त्यावेळी अख्खं गाव मुलावर दावा करतं.
4/13
काही चित्रपट आपल्या मनावर आणि हृदयावर इतका प्रभाव पाडतात की, तो चित्रपट तुमच्या बराच काळ लक्षात राहतो. हा असा एक हिंदी चित्रपट आहे, जो पाहिल्यानंतर बहुतेक प्रेक्षकांच्या मनाला अस्वस्थ करतो. हा सर्वात त्रासदायक ठरलेल्या हिंदी चित्रपटांपैकी एक मानला जातो. चित्रपटाचा विषय खूपच धाडसी आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. हा चित्रपट म्हणजे, 'मातृभूमी : अ नेशन विदाउट वुमन'.
5/13
'मातृभूमी : अ नेशन विदाउट वुमन' हा सिनेमा 2003 मध्ये प्रदर्शित झाला. ट्यूलिप चोशी, सुधीर पांडे, सुशांत सिंह, पियुष मिश्रा आणि आदित्य श्रीवास्तव यांनी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
6/13
हा चित्रपट बिहारमधील एका गावाची संस्कृती, तिथल्या अनिष्ट चालीरिती, रुढी, परंपरांवर भाष्य करतो. स्त्री-पुरूष समानता आणि मुलींची हत्या यांसारखे समाजातील विषय अतिशय धक्कादायक पद्धतीनं दाखवण्यात आले आहेत.
7/13
चित्रपटाची कथा गावात एका मुलीच्या जन्मापासून सुरू होते. वडीलांना मुलाची अपेक्षा असते, पण त्यांना मुलगी होते. मुलगी झाल्यामुळे वडील नाराज होतात. ते मुलीची हत्या करतात. मुलींना मारल्यानंतर गावात फक्त पुरुषच राहतो, तेव्हा चित्रपट भविष्य दाखवतो. काही वृद्ध महिला असतात.
8/13
गावातील पुरूष महिलांच्या अनुपस्थितीमुळे नैराश्यात जातात. ते पॉर्न पाहतात, क्रॉस-जेंडर डान्सर्ससोबत अश्लील कृत्य करतात. एवढंच काय तर ते प्राण्यांनाही सोडत नाहीत. गावातील वातावरण खूपच भीषण दाखवलं आहे.
9/13
दरम्यान, गावातील एक श्रीमंत माणूस ज्याला पाच मुलं आहेत, तो त्याच्या मुलांचं लग्न एका दूरच्या गावातील मुलीशी करतो. त्या एकट्या मुलीचं लग्न पाच भावांशी केलं जातं. मुलीचं नाव कल्की आहे. दर आठवड्याला तिला त्यापैकी एकासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतात. धक्कादायक बाब म्हणजे, तिच्या पाच पतींव्यतिरिक्त, तिला तिच्या सासऱ्यांसोबतही शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं जातं.
10/13
पाच भावांपैकी सर्वात धाकटा भाऊ फक्त कल्कीशी चांगले वागतो. त्यामुळे कल्की त्याच्याकडे आकर्षित होते, पण ते पाहून इतर भावांना राग अनावर होतो. रागात सगळे भाऊ एकत्र येऊन लहान भावाची हत्या करतात. जेव्हा कल्की गर्भवती होते, तेव्हा सर्वजण आनंदी असतात की, तिच्या पोटात त्यांचाच 'मुलगा' असेल. संपूर्ण गाव स्वतःला मुलाचा बाप म्हणवून एकमेकांशी भांडत असतं. प्रकरण पुढे एवढं वाढतं की, सगळे एकमेकांची हत्या करायला लागतात.
11/13
भांडणं, तंटे एवढे वाढतात की, सगळे एकमेकांचे जीव घेत सुटतात. फिल्मच्या शेवटी गावात मोठा हिंसाचार होतो आणि कल्कि एका मुलीला जन्म देते.
12/13
फिल्म पाहिलेल्या एका प्रेक्षकानं रेडिटवर लिहिलंय की, फिल्मचा विषय खूपच बोल्ड आणि समाजातील रूढी, परंपरांवर भाष्य करणारा आहे. ही फिल्म पाहिलेल्या अनेक प्रेक्षकांचं म्हणणं आहे की, फिल्म पाहिल्यानंतर पुढचे कित्येक दिवस माणूस तणावात राहतो.
13/13
तुम्हाला हा सिनेमा पाहायला असेल तर, अॅमेझॉन प्राईम किंवा युट्यूबवर पाहू शकता. एका वर्षात युट्यूबवर या चित्रपटाला 1.9 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आयएमडीबीवर या चित्रपटाचं रेटिंग 7.7 आहे.
Published at : 20 Aug 2025 01:35 PM (IST)