शुटींगची निसर्गरम्य जागा अन् ग्रामीण भागाची मज्जा, अभिनेत्रीने शेअर केला साताऱ्यातील शुटींगचा अनुभव
लाखात एक आमचा दादा या मालिकेचं साताऱ्यातील वाई भागात शुटींग सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा अनुभव शेअर करताना अभिनेत्रीने म्हटलं की, आम्ही सातारा, वाई भागात शूट करतोय. वाईच्या आधी एक छोटंसं गाव पडत मयुरेश्वर तिथे आमचा सेट आहे, आमचा वाडा आहे आणि आम्ही कलाकार ही इथेच आसपास राहत आहोत.
पुढे तिने म्हटलं की, इथे शूट करण्याची खासियत म्हणजे हे ठिकाण खूप निसर्गरम्य आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हिरवळच दिसतेय. त्यामुळे माझा पूर्ण दिवस एकदम मस्त जातो.
'कामासाठी मी जगभर फिरते पण कधी गावात शूटिंग करायचा अनुभव नव्हता मिळाला. पण 'लाखात एक आमचा दादा' मालिकेमुळे मला ही संधी मिळाली.'
कितीदा असं झालं आहे की, आऊटडोर शूटिंग लागलंय आणि तिथे फोनला नेटवर्क नाही, पण हेच जर मी मुंबईत असताना झालं असत तर मी पॅनिक झाले असते.
इथेच एका घरात आम्ही जेवतो त्या मावशींची शेती आहे आणि त्या दररोज ताज्या भाज्या काढून आमच्यासाठी जेवण बनवतात. इतकं स्वादिष्ट जेवण मी आज पर्यंत कधीच खाल्ले नाही.