Gudi Padwa 2023 : मराठी सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा; पाहा फोटो
राहुल देशपांडे यांनी कुटुंबियांसोबत गुढीपाडवा साजरा केला आहे. गुढीसोबतचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमधुराणीने गुढीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत तिने लिहिलं आहे,चैत्र गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!!!.
'हृदयी प्रीत जागते' या मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या सिद्धार्थने चाहत्यांना गुढी पाडव्याच्या आणि मराठी नवं वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतील अभिनेत्री साक्षी गांधीने गुढीपाडव्यानिमित्त खास फोटोशूट केलं आहे.
गौतमी देशपांडेने गुढी पाडवा आणि नवं वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रवी जाधनने पत्नीसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने दोन्ही मुलं आणि गुढीसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वानंदी टिकेकरने गुढीसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलं आहे,गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा.
हेमांगी कवीने मराठमोळ्या लुकमधील गुढीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रेणुका शहाणेने गुढीसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.