PHOTO: अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीचा मनमोहक अंदाज; साडी नेसून दिल्या अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!
अग्निहोत्र,आभाळमाया,उंच माझा झोका,एका लग्नाची दुसरी गोष्ट,एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकांमधील स्पृहाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
स्पृहा जोशी
1/8
अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) ही तिच्या कवितांनी आणि अभिनयांनी प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
2/8
स्पृहा ही ‘लोकमान्य’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.
3/8
नेव्हर माईंड,पेईंग घोस्ट,बायोस्कोप,लहानपण देगा देवा,नांदी,समुद्र या नाटकांमध्ये स्पृहानं काम केलं. तसेच तिनं मोरया, देवा या चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारली.
4/8
स्पृहानं छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अग्निहोत्र,आभाळमाया,उंच माझा झोका,एका लग्नाची दुसरी गोष्ट,एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकांमधील स्पृहाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
5/8
‘उंच माझा झोका’ या मालिकेतील स्पृहाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
6/8
तसेच सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे तिनं सूत्रसंचालन देखील केलं आहे.
7/8
मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने अक्षय्य तृतीयेनिमित्त खास फोटोशूट केले आहे.या फोटोशूटसाठी स्पृहाने पिवळ्या रंगाची चिकनकारी साडी नेसली आहे.
8/8
स्पृहाने चाहत्यांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
Published at : 30 Apr 2025 03:17 PM (IST)