Sonalee Kulkarni : खणाच्या साडीत खुललं अप्सरेचं सौंदर्य; मनमोहक फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच, सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. (PHOTO : @sonalee18588/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. (PHOTO : @sonalee18588/Instagram)
सोनाली सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. (PHOTO : @sonalee18588/Instagram)
सध्या सोनाली तिच्या नव्या फोटोशूटमुळं चर्चेत आहे. (PHOTO : @sonalee18588/Instagram)
खणाच्या साडीमधील मनमोहक फोटोंमधून सोनालीनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (PHOTO : @sonalee18588/Instagram)
सोनाली कुलकर्णीनं हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. खणाच्या साडीत सोनालीचं सौंदर्य आणखी खुललं आहे. (PHOTO : @sonalee18588/Instagram)
सोनालीनं खणाच्या साडीला थोडा मॉर्डन टच दिला आहे. सोनालीनं काळ्या रंगाचा बॅकलेस ब्लाउज साडीसोबत मॅच केला आहे. (PHOTO : @sonalee18588/Instagram)
चाहत्यांना हा लूक आवडला असून सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येत आहे. (PHOTO : @sonalee18588/Instagram)
(PHOTO : @sonalee18588/Instagram)