BMC निवडणूक निकालानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; ‘पॉवर’ शब्दावर थेट सवाल

Actress Sharmila Shindes Post Goes Viral: मुंबई महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मराठी अभिनेत्री शर्मिला शिंदे हिनं पोस्ट शेअर केली.

Continues below advertisement

Actress Sharmila Shindes Post Goes Viral

Continues below advertisement
1/8
15 जानेवारी रोजी 29 महानगरपालिकांची निवडणूक पार पडली. तर, 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर झाला.
2/8
मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीनं बहुमताचा आकडा गाठला. भाजपला 89 तर, शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागांवर विजय मिळवता आला.
3/8
महायुतीने बहुमताचा आकडा गाठला असून, नेमका महापौर कोण होणार? याकडे सर्वांच्याच नजरा आहे.
4/8
दरम्यान, महायुतीच्या बाजूने निकाल लागताच मराठी अभिनेत्रीनं एक पोस्ट शेअर केली. तिच्या पोस्टची सध्या सोशल मीडियात होत आहे.
5/8
अलिकडेच मराठी अभिनेत्री शर्मिला शिंदे हिची इन्स्टाग्रामची पोस्ट सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे.
Continues below advertisement
6/8
तिनं सोशल मीडियात पोस्ट करत म्हटलं की, "माझ्या देशात सर्वात चुकीचा वाटणारा शब्द म्हणजे पॉवर. अमुक पक्ष किंवा राज्य /देशात पॉवरमध्ये असते कशी काय? असा प्रश्न मनात येतो".
7/8
"लोकशाहीमध्ये जर कुणी पॉवरमध्ये असते तर, ती फक्त जनता आहे. बाकी आपण सगळे पगारावर काम करणारे जनतेचे सेवक आहोत",असं तिनं म्हटलं.
8/8
यावेळी शर्मिला शिंदेनं उदाहरण देत सांगितलं की, "माझ्या घरात स्लायडिंग विंडोचं काम करायला आलेल्या व्यक्तीला मी सांगते की, मी नेमकी विंडो कशी हवी आहे. तो कामगार व्यक्ती ठरवत नाही की विंडो कशी असेल..", असं शर्मिलानं म्हटलं होतं.
Sponsored Links by Taboola