Rupali Bhosle : भरजरी लेहंगा, पारंपरिक दागिने; रुपाली भोसलेचा नववधू साज
फारच कमी दिवसांत छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. (PHOTO : @rupalibhosle /Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. लवकरच अनिरुद्ध आणि संजना यांचं लग्न होणार आहे. अशातच या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले चर्चेत आली आहे. (PHOTO : @rupalibhosle /Instagram)
अभिनेत्री रुपाली भोसलेचं लेटेस्ट फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रुपालीनं काही दिवसांपूर्वी एक ब्रायडल फोटोशूट केलं आहे. नववधू साजात रुपाली सुंदर दिसतेय. (PHOTO : @rupalibhosle /Instagram)
खरं तर रुपालीचे हे फोटो व्हायरल होताच, संजना आणि अनिरुद्ध यांचा विवाह खरंच होणार का? असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जातोय. (PHOTO : @rupalibhosle /Instagram)
या फोटोंमध्ये मालिकेतील संजना म्हणजेच, रुपाली भोसलेनं लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तसेच रुपालीनं भरजरीत दागिन्यांसह ब्रायडल लूक कम्प्लिट केला आहे. (PHOTO : @rupalibhosle /Instagram)
रुपालीचा रॉयल अंदाज चाहत्यांनाही आवडला असून चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला जात आहे. (PHOTO : @rupalibhosle /Instagram)
(PHOTO : @rupalibhosle /Instagram)
(PHOTO : @rupalibhosle /Instagram)