In Pics : मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीची जबरदस्त कामगिरी, 'वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदलं नाव
Marathi Actress Meera Joshi
1/10
मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीच्या एका जबरदस्त कामगिरीची सध्या चर्चा आहे. तिचं नाव या कामगिरीनं 'वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदलं आहे.
2/10
मीरानं भारतातील सर्वात उंच मंदिरांपैकी एक असणाऱ्या उत्तराखंडमधील तुंगनाथाचे अर्थात भगवान शिव मंदिरासमोर तब्बल दोन तास नृत्य केलं आहे.
3/10
यामुळं तिनं ‘High Range Book Of World Records’ आणि ‘India Records’मध्ये नाव कोरलं आहे.
4/10
मीराने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. असा विक्रम करणारी ती पहिलीच अभिनेत्री ठरली आहे.
5/10
नृत्याच्या आवडीने आणि भगवान शंकराच्या आशिर्वादाने हे शक्य झाल्याचे मीरा सांगते.
6/10
मीराला ट्रेकिंगची देखील आवड आहे. तिने अनेक अवघड ट्रेक देखील केले आहेत.
7/10
तुंगनाथ हे उत्तराखंडमध्ये स्थित शिव मंदिर आहे. 16 मार्चला पहाटे तीन वाजता मीराने या ट्रेकला सुरुवात केली होती.
8/10
तुंगनाथ मंदिराकडे जाताना ट्रेकदरम्यान या भागात 6 अंश सेल्सिअस तापमान होते. सर्वत्र बर्फाच्या चादरी पसरल्या होत्या, असं मीरानं सांगितलं.
9/10
अभिनेत्री मीरा जोशी ही उत्तम नर्तकी देखील आहे. ती आपले नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
10/10
मीराचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. (सर्व फोटो मीरा जोशीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन घेतले आहेत.)
Published at : 12 Apr 2021 08:33 PM (IST)