In Pics : या मराठमोळ्या अभिनेत्रीचा साऊथमध्ये जलवा! सोशल मीडियावर लाखो चाहते
अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या अभिनयाचे आणि तिच्या अदांचे कित्येक चाहते आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाग्यश्री मोटे ही पुण्याची असून ती सध्या मुंबईत रहाते.
तिने अर्थशास्त्रात तिची पदवी घेतली आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच भाग्यश्रीला अभिनयाची आवड होती.
भाग्यश्रीनं मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम केलं आहे.
देवो के देव महादेव, सिया के राम या हिंदी मालिकांमुळे ती ओळखली जाते.
देवयानी ही तिची पहिली मराठी मालिका होती.
भाग्यश्रीचा मराठी सिनेमा क्षेत्रातला पदार्पणाचा सिनेमा ' शोधू कुठे' हा होता.
भाग्यश्रीला अभिनयासोबत बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.
भाग्यश्रीने स्वतःच्या करियरची सुरुवात मॉडेलिंगने केली.
भाग्यश्रीने काय रे रास्कला, पाटील, माझ्या बायकोचा प्रियकर, विठ्ठल या सिनेमांमध्ये काम केलं. चिकाटी गडिलो चिथा कोटूडू या तेलगू सिनेमातून तिने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. ती सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते. तिचे लाखो फॉओअर्स आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक आणि कमेंट्सचा पाऊस असतो.