'GF बनशील की लग्न करशील...?', प्रसिद्ध मराठी अभिनेता पडला मेकअप आर्टिस्टच्या प्रेमात; असा मिळवला होकार!
Shubham Murudkar and Srushti Jadhav engagement photos viral: शुभम मुरुडकर आणि सृष्टी जाधव यांचा 19 फेब्रुवारीला साखरपुडा थाटामाटात पार पडला.

Shubham Murudkar and Srushti Jadhav engagement
1/8
Marathi TV Actor Shubham Murudkar to Tie the Knot Soon: कलाकार आणि मेकअप आर्टिस्ट यांचं नातं अनोखं असतं. रंगभूमीवर जाण्याआधी कलाकाराची भेट मेकअप आर्टिस्टशी होत असते. दोघांमध्ये एक वेगळं नातं असतं.
2/8
पण आता मराठी कलाकार आणि मेकअप आर्टिस्ट खऱ्या आयुष्यात पती पत्नी होणार आहेत. दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
3/8
सन मराठीवरील 'मी माझा संसार रेखिते' या मालिकेतून ईशान अर्थात अभिनेता शुभम मुरुडकर घराघरात पोहोचला. त्यानं प्रेक्षकांची मने जिंकली. तो लवकरच आयुष्यातील त्याच्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे.
4/8
शुभम मुरुडकर याचा नुकताच साखरपुडा झाला. मेकअप आर्टिस्ट गर्लफ्रेंड सृष्टी जाधवसोबत त्याची एंगेजमेंट झाली आहे. तो लवकरच सृष्टीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
5/8
दोघांच्या साखरपुड्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
6/8
कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत शुभमकडे कास्टिंगची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हा मालिकेत मेहेंदी आर्टिस्ट हवी होती. मेहेंदी आर्टिस्ट दिसायला सुंदर हवी होती.
7/8
एका सहकलाकाराने सृष्टीचं नाव सुचवलं. सृष्टीसाठी सगळं नवीन होतं. शुभमसोबत सृष्टीची पहिली भेट झाली. मुंबईत एकमेकांना भेटले. दोघांचं बोलणं वाढलं. मैत्री वाढली. गप्पा रंगल्या.
8/8
मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. शुभमने सृष्टीला प्रपोज केलं. 'GF बनशील की नाही, की थेट लग्न करशील?', असं म्हणत त्यानं प्रपोज केलं. सृष्टीनं नंतर होकार दिला. दरम्यान, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 19 फेब्रुवारीला दोघांचा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला.
Published at : 23 Feb 2026 12:51 PM (IST)