Marathi Actor Rugved Phadke Marriage Photos: मराठी अभिनेत्यानं गर्लफ्रेंडसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ; दोघांच्या पारंपारिक लूकनं वेधलं लक्ष PHOTOs
Marathi Actor Rugved Phadke Marriage Photos: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकला असून त्यानं गुपचूप लग्न उरकलं आहे.

Marathi Actor Rugved Phadke Marrage Photos
1/11
Marathi Actor Rugved Phadke Marriage Photos: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकला असून त्यानं गुपचूप लग्न उरकलं आहे.
2/11
अभिनेता ऋग्वेद फडके याने गर्लफ्रेंड विभा पवार हिच्यासोबत गुपचूप लग्न केलंय.
3/11
अभिनेता ऋग्वेद फडके आणि गर्लफ्रेंड विभा पवार यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
4/11
जवळचे नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत ऋग्वेद आणि विभा यांनी आपली लग्नगाठ बांधली.
5/11
पारंपरिक पद्धतीनं ऋग्वेद आणि विभा यांनी सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केलीय.
6/11
ऋग्वेद आणि विभा यांनी आयुष्यातील या खास क्षणासाठी पारंपरिक लूकला पसंती दिली.
7/11
ऋग्वेदनं धोतर, अंगरखा आणि टिळक टोपी असा पेहराव केला होता. या पेहरावात तो राजबिंडा दिसत होता. तर विभा पवार यांनी नऊवारी साडीत नववधू लूक केला होता.
8/11
लग्नानंतर त्यांचा रिसेप्शन सोहळाही पार पडला. यासाठी ऋग्वेदनं सूट वेअर केलेला. तर त्याची पत्नी विभानं पैठणी साडी नेसली होती.
9/11
ऋग्वेद आणि विभा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडलेला.
10/11
साखरपुड्यानंतर तब्बल वर्षभरानंतर आता ऋग्वेद आणि विभा लग्नबंधनात अडकले आहेत.
11/11
ऋग्वेदनं 'पारू', 'अबोल प्रितीची अजब कहाणी', 'थोडं तुझं थोडं माझं' या मालिकांमध्ये काम केलंय.
Published at : 05 May 2026 07:52 AM (IST)