PHOTO: मानुषी छिल्लरचे नशीब चमकलं, 'या' मोठया चित्रपटात दिसणार जॉन अब्राहमसोबत!
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मानुषी छिल्लरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता अभिनेत्रीच्या हातात आणखी एक मोठा प्रोजेक्ट आला आहे. होय, मानुषी तिच्या पुढच्या चित्रपटाची तयारी करत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
'तेहरान' या चित्रपटात ती जॉन अब्राहमसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एवढेच नाही तर मानुषीने जॉनसोबत चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
अलीकडेच, निर्मात्यांनी चित्रपटाच्या सेटवरून मानुषीची छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये ती शूटिंगच्या ठिकाणी जॉन अब्राहमसोबत दिसत आहे. यासोबतच या चित्रपटातील मानुषीचा लूकही समोर आला आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
'तेहरान'चे दिग्दर्शन अरुण गोपालन यांनी केले आहे. दिनेश विजन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटानंतर मानुषी अभिनेता विकी कौशलसोबत 'द ग्रेट इंडियन फॅमिली'मध्ये दिसणार आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)