Mangalagaur celebration ; ‘नव दांपत्याची मंगळागौर’ साजरी करायला एकत्र आलं संपूर्ण झी मराठीच कुटुंब !

झी मराठीच्या नायिका नव दामपत्यांची मंगळागौर साजरा करण्यासाठी एकत्र आल्या.

Mangalagaur celebration

1/15
नुकताच श्रावण महिना सुरु झाला आहे आणि त्याबरोबरच सणांना सुद्धा सुरुवात झाली आहे.
2/15
नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी अनेक सण साजरे केले जातात आणि त्यातलाच एक महत्वाचा सण म्हणजे मंगळागौर.
3/15
नवविवाहित आणि सौभाग्यवती महिला हा सण अगदी आनंदाने साजरा करतात.
4/15
झी मराठीवरही अशीच काही जोडपी आहेत ज्यांची नुकतीच लग्न झालीयेत.
5/15
म्हणूनच झी मराठीच्या नायिका 'नव दामपत्यांची मंगळागौर' साजरा करण्यासाठी एकत्र आल्या.
6/15
यावेळी अभिनेत्री तितिक्षा तावडे म्हणते, "मी पहिल्यांदाच मंगळागौर खेळले या आधी मला कधी संधी मिळाली नव्हती. पण ह्यावर्षी खऱ्या आयुष्यात माझं लग्नही झालंय आणि हा मंगळागौरीचा योग जुळून आला. माझ्यासाठी खूप आनंदमय अनुभव होता.
7/15
यावेळी तितिक्षाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. या मराठमोळ्या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
8/15
तर, अभिनेत्री शिवानी नाईक म्हणाली, मंगळागौरीच्या सणादरम्यान खूपच मज्जा आली. ह्या आधी मी कधीच मंगळागौर खेळली नव्हते.
9/15
मी कार्यक्रमांना उपस्थित राहिलेय पण खेळायचा योग कधी जुळून आला नव्हता.
10/15
अभिनेत्री अक्षया हिंदाळकरने सांगितले,"मालिकेच्या निमित्ताने माझी ही पहिली मंगळागौर होती. माझ्यासाठी हा खूपच नवीन अनुभव होता.
11/15
मला सर्वात जास्त आकर्षक वाटलं ते म्हणजे खेळांचं. मी आणि आकाशने पहिल्यांदा फुगडी घातली.
12/15
तर, अभिनेत्री वल्लरी विराजने सांगितले, "माझा मंगळागौरीचा हा पहिलाच अनुभव होता. पण मला वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या घालण्यात खूप मज्जा आली.
13/15
त्रीफुला फुगडी, बस फुगडी, फुलपाखरू असे अनेक खेळ होते आणि ते खेळण्यात कस लागला पण मज्जाही तितकीच आली. माझ्यासोबत एजे सुद्धा खेळात सहभागी झाले होते.
14/15
अभिनेत्री पूर्वा कौशिकने सांगितले , " मी मंगळागौर कधी खेळली नाहीये, झी मराठी कुटुंबाच्या सर्व मैत्रिणींबरोबर मी पहिल्यांदा मंगळागौरचे खेळ खेळले खूप भन्नाट वाटले.
15/15
या निमित्ताने मला एक गोष्ट पदोपदी जाणवली ती म्हणजे आपल्या पणजी, आजी आणि आई कशा इतक्या स्फुर्तीने सर्व काम करायच्या. या सर्वजणी असे खेळ खेळल्या आहेत. हा खेळ खेळण्यासाठी एक वेगळी ऊर्जा लागते जी त्या पिढीमध्ये निर्माण झाली आहे.
Sponsored Links by Taboola