12 वर्षांनी लहान अर्जुन कपूरला डेट करणाऱ्या मलायका अरोराने सांगितली 'ही' मोठी गोष्ट!
(photo:malaikaaroraofficial/ig)
1/6
मलायका अरोरा तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.(photo:malaikaaroraofficial/ig)
2/6
सध्या ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही जवळपास पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अर्जुन मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, त्यामुळे अनेकदा अभिनेत्री ट्रोल झाली आहे. याबाबत मलायकाने अनेकदा आपली बाजू मांडली आहे आणि पुन्हा एकदा तिने एका मुलाखतीत याबद्दल बोलले आहे.(photo:malaikaaroraofficial/ig)
3/6
मलायका म्हणाली, ब्रेकअप किंवा घटस्फोटानंतर महिलेला आयुष्य जगण्यासाठी कारण मिळणे खूप गरजेचे असते. स्त्री संबंधांबाबत अतिशय वाईट दृष्टीकोन ठेवला जातो. जर एखाद्या महिलेने आपल्यापेक्षा लहान मुलाशी डेट केले तर तो मुद्दा बनवला जातो.(photo:malaikaaroraofficial/ig)
4/6
मलायका पुढे म्हणाली की ती तिच्या आईचा सल्ला मानते. मलायका म्हणते- मी माझ्या आईची सावली आहे, तिच्या ताकदीने आणि विचारधारेने मी आयुष्यात पुढे जाते. ती मला नेहमी माझ्या अटींवर आणि स्वतंत्रपणे जगण्याचा सल्ला देते.(photo:malaikaaroraofficial/ig)
5/6
याआधीही एका मुलाखतीत मलायकाने अर्जुनसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलून दाखवले आणि म्हणाली की, तिच्याबद्दल कोणी काय बोलले याची तिला पर्वा नाही.(photo:malaikaaroraofficial/ig)
6/6
2017 मध्ये मलायकाने परस्पर संमतीने अरबाज खानपासून घटस्फोट घेतला होता.(photo:malaikaaroraofficial/ig)
Published at : 22 Apr 2022 12:18 PM (IST)