Mother's Day निमित्त मलायका अरोराने शेअर केला तिच्या मुलाच्या जन्माचा अनुभव!
नुकताच जगभरात ‘मातृदिन’ साजरा करण्यात आला. (photo:malaikaaroraofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयानिमित्ताने काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील त्यांच्या आईंसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. आता अभिनेत्री मलायका अरोराने (Malaika Arora) देखील तिच्या मुलाच्या जन्माचा अनुभव शेअर केला आहे. (photo:malaikaaroraofficial/ig)
मलायका अरोरा वर्किंग मदर होण्याबद्दल आणि या मातृत्वाचा तिच्या आयुष्यावर आणि करिअरवर कसा परिणाम झाला, तसेच 'वर्किंग मदर' म्हणून तिला कसे गिल्ट वाटले, याबद्दल बोलली आहे. (photo:malaikaaroraofficial/ig)
अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिचा मुलगा अरहान खानसोबतच्या तिच्या नात्याचा प्रवास दाखवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये, मलायका हे देखील सांगते की, लोकांनी तिला कसे सांगितले की, गर्भधारणेनंतर तिची कारकीर्द संपेल, म्हणून मूल होऊ देऊ नको, असा सल्ला दिला होता. (photo:malaikaaroraofficial/ig)
अरहान हा मलायकाचा माजी पती अरबाज खानचा मुलगा आहे. (photo:malaikaaroraofficial/ig)
मलायका आणि अरबाजचे लग्न 1998मध्ये झाले होते आणि अरहानचा जन्म 2002 मध्ये झाला होता. अरबाज आणि मलायका 2017मध्ये वेगळे झाले, पण ते त्यांच्या मुलासाठी नेहमी एकत्र दिसते. अभिनेत्री सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. (photo:malaikaaroraofficial/ig)