'अभी मैं सिंगल हूँ...' अर्जुन कपूरच्या 'त्या' जाहीर विधानावर मलायका अरोरा पहिल्यांदाच बोलली, ब्रेकअपबद्दल सांगितलं असं काही की....
बॉलिवूडमधील प्रेमकरणांची नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चा होते. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या नात्याबद्दल बोललं जातंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या बऱ्याच दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा रिलेशनमध्ये होते. त्या दोघांनी एकत्र असल्याचे अनेक फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.
मात्र काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने जाहीरपणे आता मी सिंगल असल्याचे सांगून टाकले होते. त्याच्या या विधानानंतर मलायका आणि अर्जुन एकमेकांपासून वेगळे झाले आहेत हे स्पष्ट झाले आहे.
त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आल्यानंतर मलायका अरोरा नंतर अनेक कार्यक्रमांत झळकली होती. मात्र तिने अर्जुन कपूरच्या विधानावर अद्याप कोणतंही भाष्य केलं नव्हतं.
मात्र आता ईटाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत तिने अर्जुन कपूरच्या 'अभी तो मै सिंगल हूँ' या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मी माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी कधीही काहीही सांगणार नाही. ते मला आवडणारं नाही. त्यामुळेच अर्जुन कपूरने जे काही विधान केलं आहे, तो त्याचा अधिकार आहे. त्याच्या विशेषाधिकाराअंतर्गत त्याने हे विधान केलं आहे, त्यामुळे मला यावर काहीही बोलायचं नाही, असं मलायका अरोराने सांगितले.
दरम्यान, अर्जुन कपूर दिवाळीमध्ये एका कार्यक्रमात गेला होता. याच कार्यक्रमात लोकांनी मलायका अरोराचे नाव घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मी आता सिंगल आहे, काळजी करू नका, असे म्हणत त्या दोघांत ब्रेकअप झाल्याचे कन्फर्म केले होते.
मलायका अरोरा
मलायका अरोरा
मलायका अरोरा
मलायका अरोरा
मलायका अरोरा