आपलं आयुष्य 25 व्या वर्षी संपवणं योग्य नाही; वयाच्या चाळीशीत प्रेम मिळणं ही नॉर्मल गोष्ट' मलायकाची नवी पोस्ट
Malaika Arora-Arjun Kapoor : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) ही बॉलिवूडमधील चर्चात असणारी जोडी आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोघेही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
image 3काही दिवसांपासून अर्जुन आणि मलायका यांच्या ब्रेकअपबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू होत्या.
मलायकानं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. 'वयाच्या चाळीशीत प्रेम मिळणं ही नॉर्मल गोष्ट, असं पोस्टमध्ये तिने लिहिले आहे.
मलायकाने पोस्टमध्ये लिहिले, 'वयाच्या चाळीशीत प्रेम करणं या गोष्टीला आपण नॉर्मलाइज केलं पाहिजे. ही गोष्ट नॉर्मल आहे. 30 वय झाल्यानंतर नव्या गोष्टी शोधल्या पाहिजेत. 50 व्या वर्षी नवीन गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. आपलं आयुष्य 25 व्या वर्षी संपवणं योग्य नाही. असे विचार करणं बंद करा.'
मलयाकाच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
काही दिवसांपासून सोशल मीडियावर अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअप बद्दल अफवा पसरत होत्या. त्याबद्दल अर्जुननं पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये अर्जुननं लिहिले, 'अशा अफवांना इथं जागा नाही. सर्वांनी सुरक्षित राहा. सर्वांचं चांगलं होण्यासाठी प्रार्थना करा. सर्वांना प्रेम. ' (all photo:malaikaaroraofficial/ig)