Malaika Arora : ट्रोलर्सला मलायकानं दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली..
(photo: /malaikaaroraofficial/ig)
1/6
Malaika Arora : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या स्टायलिश लूकमुळे नेहमी चर्चेत असते. (photo: /malaikaaroraofficial/ig)
2/6
तिच्या लूकचे काही लोक कौतुक करतात तर काही लोक तिला ट्रोल करतात. (photo: /malaikaaroraofficial/ig)
3/6
काही दिवसांपूर्वी मलायकाचे नेटेड ब्लॅक ड्रेस आणि हाय हिल्स अशा लूकमधील फोटो व्हायरल झाले होते. या फोटोला कमेंट करून काही नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल केले. या ट्रोलर्सला मलायकानं सडेतोड उत्तर दिलं आहे. (photo: /malaikaaroraofficial/ig)
4/6
एका मुलाखतीमध्ये मलायकानं सांगितलं की, 'लोक ढोंगी आहेत. हॉलिवूड अभिनेत्री रिहाना,जेनिफर लोपेज आणि बियॉन्स जे कपडे घालतात त्या कपड्यांचे लोक कौतुक करतात. पण तसेच कपडे जर तुम्ही घातले तर लोक तुम्हाला ट्रोल करतील. लोक तुम्हाला प्रश्न विचारतात की तु असा लूक का करतेस? लोकांनी ढोंगीपणा सोडून दिला पाहिजे. त्यांनी हॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच बॉलिवूडमधील अभिनेत्रींचे देखील कौतुक केले पाहिजे.' (photo: /malaikaaroraofficial/ig)
5/6
पुढे मुलाखतीमध्ये मलायकानं सांगितलं की ट्रोल करणाऱ्यांकडे ती लक्ष देत नाही पण तिचे आई-वडील या ट्रोलर्सकडे लक्ष देतात.मलायकाला अनेक वेळा तिच्या आणि अर्जुनच्या नात्यामुळे देखील ट्रोल केले जाते. (photo: /malaikaaroraofficial/ig)
6/6
मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. वयात असणाऱ्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. (photo: /malaikaaroraofficial/ig)
Published at : 10 Mar 2022 01:34 PM (IST)