PHOTO: कृष्णा घट्टामनेनी यांच्या पुण्यतिथी निमित्त महेश बाबू यांनी घेतला मोठा निर्णय!
mahesh babu
1/11
टॉलिवूडचा प्रिन्स अर्थात अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) त्याचा अभिनय आणि सिनेमांसाठी ओळखला जातोच. पण सामाजिक कामं करण्यातही तो आघाडीवर आहे.
2/11
आता अभिनेत्याने 40 गरीब विद्यार्थांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
3/11
महेश बाहू सामाजिक कामांमध्ये खूप अग्रेसर आहे. गरजू लोकांना मदत करायला त्याला आवडतं.
4/11
आता कृष्णा घट्टामनेनी (Krishna Ghattamaneni) यांच्या पुण्यतिथी निमित्त महेश बाबू यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महेश बाबू यांनी गरीब विद्यार्थांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
5/11
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, महेश बाबू आणि त्यांची पत्नी नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) यांनी 2020 मध्ये बाबू फाऊंडेशनची स्थापन केली आहे. वडिलांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी महेश बाबू फाउंडेशनतर्फे सुपरस्टार कृष्णा एजुकेशनल फंडची स्थापना केली होती
6/11
या शैक्षणिक फंडमार्फत हृदयाचा त्रास असणाऱ्या विद्यार्थांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली. महेश बाबू फाउंडेशनतर्फे विद्यार्थांच्या शिक्षणाचा खर्च करण्यात आला. महेश आणि नम्रता यांचा मुलगा गौतम याला हृदयाचा त्रास असल्याने त्यांनी 40 विद्यार्थांचा शाळा ते पदवीपर्यंतचा शैक्षणिक खर्च उचलण्याचा विडा हाती घेतला आहे.
7/11
महेश बाबू अभिनय, सिनेमे आणि व्यवसायाच्या माध्यमातून चांगलीच कमाई करतात. या कमाईतला 30% हिस्सा ते गरजू लोकांवर खर्च करतात.
8/11
गरजू लोकांना मदत करणं महेश बाबू यांना आवडतं. महेश बाबू एनजीओ चालवतात. रेन्बो चिल्ड्रन रुग्णालयाचे ते असोसिएट आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, महेश बाबू यांनी 1000 पेक्षा अधिक बालकांची हार्ट सर्जरी करत त्यांचा जीव वाचवला आहे.
9/11
महेश बाबू यांनी दोन गाव दत्तक घेतले आहेत. बुरिपलेम आणि बुरिपलेम ही दोन गावं त्यांनी दत्तक घेतली आहेत.
10/11
गावातील रस्ते, शाळा, रुग्णालय आणि पिण्याचे पाणी अशा सर्व सुविधा पूर्ण करण्याची जबाबदारी महेश बाबू यांनी घेतली आहे.
11/11
all photo creadit: https://www.instagram.com/urstrulymahesh/
Published at : 17 Nov 2023 01:51 PM (IST)