Mahesh Babu : महेश बाबू म्हणाला, 'बॉलिवूडला मी परवडत नाही'

दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूनं मेजर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. (Mahesh Babu/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ट्रेलर लाँचच्या वेळी महेश बाबू म्हणाला की, 'बॉलिवूडला मी परवडत नाही' त्याच्या या वक्तव्याची चर्चा सध्या सुरू आहे. (Mahesh Babu/instagram)

मेजर चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी महेश बाबूनं सांगितलं, 'माझा उद्देश पॅन इंडिया स्टार व्हायचा नाहीये. मला दाक्षिणात्य चित्रपटांना देशभरात यश मिळवून द्यायचंय'(Mahesh Babu/instagram)
महेश बाबूनं पुढे सांगितलं, 'मला बॉलिवूडमधून खूप ऑफर्स आल्या. बॉलिवूडला मी परवडत नाही. त्यामुळे मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही.'(Mahesh Babu/instagram)
'तेलगू चित्रपटांमुळेच मला स्टारडम आणि लोकांचं प्रेम मिळालं. ' असही महेशनं सांगितलं. (Mahesh Babu/instagram)
मेजर चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया आणि महेश बाबूच्या जीएमबी एंटरटेनमेंटनं केली आहे. (Mahesh Babu/instagram)
1983 साली 'पोरातम' या चित्रपटातून बाल भूमिकेच्या माध्यमातून महेश बाबूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. (Mahesh Babu/instagram)