Maharashtrachi HasyaJatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकारांचं मानधन नेमकं किती असतं? अभिनेता पृथ्वीक प्रतापने थेट आकडाच सांगितला...
Maharashtrachi HasyaJatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरांत पोहोचला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातं.
Continues below advertisement

Maharashtrachi Hasyajatra,
Continues below advertisement
1/6
मात्र, अनेकदा इतक्या सुप्रसिद्ध शोमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं मानधन नेमकं किती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तसेच, सर्वच कलाकारांना एकसारखंच मानधन मिळतं की त्यांना देखील आपल्याप्रमाणे दर महिन्याला पगार मिळतो असे एक ना अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतीलच.
2/6
पुढे बोलताना पृथ्वीक म्हणाला की, आपला सध्या प्रॉब्लेम झालाय की आपण सगळेच मोठ्या गोष्टींकडे आकर्षित होत चाललो आहोत. आपल्याला वाटतं की या व्यक्तीला 5 लाख मिळतायत मग ते आपल्याला का नाही? पण आपण हे लक्षात घेत नाही की कधीतरी त्या व्यक्तीने सुद्धा 20 हजारांपासून सुरुवात केली असणार.
3/6
सेटवर जे ज्युनिअर आर्टिस्ट असतात त्यांना दिवसाला 800 रुपये मिळतात. त्यांचं काम दहा दिवसांचं असतं. त्यामुळे इतक्या कमी मानधनातही लोक काम करतात. त्याचप्रमाणे तुमच्या पहिल्या डेली सोपला तुम्हाला दिवसाला दिड ते दोन हजार मिळतील असं सांगितलं जातं.
4/6
थोडे आणखी प्रसिद्ध झाल्यावर मानधनात वाढ होते. अचानक कळतं की दिवसाला पगार 30 हजार इतका आहे. नंतर असं वाटू लागतं की इतक्या कमी पैशांत आणखी किती दिवसांत काम करायचं? मग ते दिवस खूप मोठे व्हायला लागतात कारण आपण 10 दिवसांत 3 लाख रुपये कमावलेले असतात. त्यामुळे यात अडकता कामा नये.
5/6
पुढे सांगताना, पृथ्वीक म्हणाला मला आता 60 हजार महिन्याला मिळतात. त्यातले 20 हजार रुपये घरभाडं, 20 हजार एसआयपी, 10 हजारांचा इन्श्युरन्स असतो. असे 40 हजार जातात. उरलेल्या 20 हजारांत मी माझं आयुष्य जगतो. यामध्ये माझ्या कुटुंबाचा मेडिकल खर्च निघतो. उरलेल्या पैशांत तुम्हाला कशात आनंद मिळतोय त्यात गुंतवा.
Continues below advertisement
6/6
आयुष्यात आजपर्यंत मीही खूपदा चुकलो आहे. सुरुवातीला मी फार पैसे उडवायचो. मग कळलं की असं नाही केलं पाहिजे. 4 सिनेमे केल्यानंतर मी इंटर्नशिप केली. तेव्हा मला 5 हजार मिळाले. ते पैसे मी चक्क उडवले. जेव्हा घरच्यांनी घरखर्चाला किती पैसे देणार आहेस असा प्रश्न केला तेव्हा मात्र मला वास्तविकता कळली.
Published at : 04 Jun 2026 03:30 PM (IST)