शिवा आणि सूर्याची महायुती!सूर्या आणि शिवाची धमाकेदार ऍक्शन !

दोन मालिकांचे कलाकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा शेड्युल हेक्टिक तर असणारच.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
झी मराठीची मालिका 'शिवा' आणि 'लाखात एक आमचा दादा' चा महासंग्राम.

सूर्यादादाची लाडकी बहीण तेजश्री लवकरच लग्नाच्या बेडीत बांधली जाणार आहे.
पहिली पत्रिका देवाला अर्पण करण्यासाठी म्हणून सूर्या , तुळजाला घेऊन मंदिरात पोहचला असतो. तिथे काही गुंड तुळजाची छेड काढतात.
सूर्या मंदिरातून बाहेर निघाल्यावर तुळजाला एके ठिकाणी थांबवून मंदिराजवळ येऊन गुंडाना धडा शिकवतो. सूर्याच्या शोधात तुळजादेखील तिकडे येते.
दुसरीकडे शिवा तलाठी कार्यालयात जाताच तिला कळतं की आजीची जमीन कुणीतरी जालिंदर नावाच्या व्यक्तीने बळकावली आहे.
त्याच क्षणी एक जण तुळजावर हल्ला करतो आणि तिला ब्रिजवरून खाली टाकण्याचा प्रयत्न करतो.
इकडे शिवा चहा प्यायला थांबली असतानां ती हे सर्व पहाते आणि जराही जीवाची पर्वा न करता तुळजाला वाचवणार आहे.
शिवा म्हणजेच पूर्वा कौशिकने आपला अनुभव व्यक्त करताना सांगितले
दुसऱ्या दिवशी तेजश्रीच्या लग्नासाठी सवाष्ण पूजनाचा कार्यक्रम असल्याने जालिंदरकडे शिवाची आजी आहे. जालिंदर आपली स्वतःची जमिन मागण्यासाठी आलेल्या बाई आजीचा भरपूर अपमान करतो हि गोष्ट शिवाला समजताच ती तडक जालिंदरला धडा शिकवायला निघते.
सूर्या सगळ्यांना घेऊन त्याच्या घरी येतो. यावेळी सूर्याच्या घरी सर्वांचे जंगी स्वागत होते.
हा महासंगम खूपच धमाकेदार असणार आहे