माधुरी दीक्षितचा 21 वर्षीय मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स; बोल्ड अन् इंटिमेट सीनमुळे आली होती चर्चेत
Madhuri Dixits Bold Song from Dayavan: माधुरी दीक्षितने दयावान चित्रपटात एका गाण्यात बोल्ड सीन दिला होता. आज फिर तुम पर प्यार आया है, हे गाणं आजही लोकप्रिय आहे.

Madhuri Dixits Bold Song from Dayavan
1/10
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित 'लाखो दिलो की धडकन' आहे. अभिनयासोबत त्यांनी आपल्या सौंदर्यातून प्रेक्षकांना घायाळ केलं आहे.
2/10
तिनं आतापर्यंत बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तसेच बड्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. 80-90 च्या दशकात तिनं हिट गाणी दिली.
3/10
त्याकाळात अभिनेत्री यशाच्या शिखरावर होती. मात्र, एका गाण्यामुळे माधुरी प्रचंड चर्चेत आली होती. तिनं आपल्या संपूर्ण कारकिर्दीत या गाण्यात सर्वात बोल्ड आणि इंटिमेट सीन्स दिले.
4/10
हे गाणं तब्बल 34 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. मात्र, अजूनही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर माधुरीनं एका मुलाखतीतून खंत देखील व्यक्त केली.
5/10
1988 साली प्रदर्शित झालेल्या दयावान या चित्रपटात माधुरीनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात विनोद खन्ना मुख्य भूमिकेत होते.
6/10
या चित्रपटातील 'आज फिर तुम पर प्यार आया हैं' हे गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यात विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांचे बोल्ड सीन्स दाखवण्यात आले.
7/10
या गाण्यात दोघांमधील प्रेम दाखवण्यात आले. त्या काळी हे प्रचंड बोल्ड मानले जात होते. दोघांमधील रोमान्स अगदी ठळकपणे या गाण्यातून दाखवण्यात आले.
8/10
दयावान हा चित्रपट त्याकाळी हिट तर झालाच, तसेच हे गाण्याला देखील पसंती मिळाली. त्या काळी हे गाणं पाहून अनेक जण थक्क झाले होते.
9/10
एका मुलाखतीत माधुरीने या गाण्याबद्दल भाष्य केलं. या सीन्समुळे नंतर निराश वाटलं असल्याचं तिनं सांगितलं.
10/10
"या सीननंतर काही दिवस मी निराश होते. तो काळ माझ्यासाठी शिकण्याता होता. प्रत्येक अनुभवातून बरंच काही शिकायला मिळतं. यातूनही मला खूप काही शिकायला मिळालं", असं माधुरी म्हणाले.
Published at : 23 Jan 2026 06:23 PM (IST)