जाणून घेऊया 'बिग बॉस मराठी'च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणारा संग्राम चौगुलेबद्दल!

'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कधी घरातील सदस्यांची भांडणे, वाद-विवाद, तर कधी बिग बॉसने दिलेला टास्क या सर्व गोष्टींमुळे यंदाचा सीझन गाजतोय. दिवसागणिक, टास्कनंतर घरातील समीकरणांमध्येही बदल होताना दिसत आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरात संग्राम चौगुलेची एन्ट्री झाल्यावर काही स्पर्धकांनी धसका घेतला आहे, तर काही स्पर्धकाना याचा काही फरक पडताना दिसत नाही.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा पहिला वाइल्ड कार्ड म्हणून घरात संग्राम चौगुलेची एन्ट्री झाली आहे.
सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर म्हणून संग्रामला ओळखलं जातं.संग्रामच्या पत्नीचं नाव स्नेहल चौगुले असं आहे.
मुळचा कोल्हापूरचा असलेल्या संग्राम चौगुले हा शरीरसौष्ठवपटू असून सध्या पुण्यात स्थायिक आहे.
संग्राम हा सहा वेळा 'मिस्टर इंडिया' तर 2012 आणि 2014 या असे दोन वेळा 'मिस्टर युनिव्हर्स' होण्याचा मान संग्रामने मिळवला होता.
संग्रामने अभिनयाच्या क्षेत्रातही आपलं नशीब आजमावलं आहे. संग्राम हा 2016 साली मराठी रुपेरी पडद्यावर 'दंभ' या चित्रपटातून झळकला होता
त्यानंतर त्याने 'आला माझ्या राशीला' मध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.
संग्रामचे इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन्स फॉलोअर्स असून सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवरही त्याचे चाहते आहेत.
सोशल मीडियावर संग्रामचे वर्कआउट करतानाचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत.