Shilpa Shinde : मालिका सोडली शिल्पाच्या आर्थिक स्थितीवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही; जाणून घ्या तिची एकूण संपत्ती!
Shilpa Shinde : 'भाबी जी घर पर हैं' (Bhabi Ji Ghar Par Hai) ही कॉमेडी मालिका 2015 पासून छोट्या पडद्यावर प्रसारित होत आहे.(photo:shilpa_shinde_official/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया टीव्ही मालिकेत एकापेक्षा एक धमाल व्यक्तिरेखा पाहायला मिळतात आणि ही मालिका पाहिल्यानंतर प्रेक्षकही पोट धरून हसतात. मात्र, या टीव्ही मालिकेशी एक वादही निर्माण झाला आहे.(photo:shilpa_shinde_official/ig)
या टीव्ही मालिकेत अभिनेत्री शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) 'अंगूरी भाभी'ची भूमिका साकारत होती. शिल्पामुळे ‘अंगुरी भाभी’ ही व्यक्तिरेखा घरोघरी प्रसिद्ध झाली.(photo:shilpa_shinde_official/ig)
शिल्पाचा अभिनय आणि तिचा बोललेला डायलॉग 'सही पकडे है' प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता.(photo:shilpa_shinde_official/ig)
आपली ही लोकप्रियता पाहून शिल्पाने मालिकेच्या निर्मात्यांना फी वाढवण्याची मागणी केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी ही मागणी फेटाळून लावली, परिणामी शिल्पा आणि 'भाबी जी घर पर हैं' च्या निर्मात्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि अभिनेत्रीने ही मालिका सोडली.(photo:shilpa_shinde_official/ig)
अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले असले, तरी अभिनेत्रीला सर्वाधिक लोकप्रियता ‘भाबीजी घर पर है’ या शोमधून मिळाली. या शोमध्ये ‘अंगूरी भाभी’ची भूमिका साकारून शिल्पाने खूप लोकप्रियता मिळवली. ‘अंगूरी भाभी’च्या भूमिकेत वर्षानुवर्षे जीव ओतून काम केल्यानंतर शिल्पाने हा शो सोडला होता. सेटवर आणि निर्मात्यांशी झालेल्या वादामुळे अभिनेत्रीने मालिकेला अलविदा म्हटले होते.(photo:shilpa_shinde_official/ig)
रिपोर्ट्सनुसार, तेव्हा शिल्पा शिंदेला प्रति एपिसोड 35,000 रुपये मिळत होते, जे अभिनेत्रीला आणखी वाढवून हवे होते. मात्र, 'भाबीजी घर पर हैं'च्या निर्मात्यांशी पंगा घेऊन शिल्पाने ही मालिका सोडली. मालिका सोडली असली तरी त्याचा तिच्या आर्थिक स्थितीवर फारसा परिणाम झाला नाही.(photo:shilpa_shinde_official/ig)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आजघडीला अभिनेत्री शिल्पा शिंदेची एकूण संपत्ती 14 कोटी रुपये आहे. शिल्पाने मालिका सोडल्यानंतर अभिनेत्री शुभांगी अत्रे ‘अंगूरी भाभी’ची भूमिका साकारत आहे आणि तिला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.(photo:shilpa_shinde_official/ig)