Gautami Patil : गौतमी पाटील विठुरायाच्या दारी; वारकऱ्यांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त
लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगौतमीने आता पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले आहे.
गौतमीने यंदाच्या आषाढी वारीत वारकऱ्यांची सेवा करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
दर्शन घेतल्यानंतर गौतमी म्हणाली की, आषाढी पायी सोहळ्यात थकलेल्या भागलेल्या वारकऱ्यांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम करण्याचा माझा विचार आहे.
विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. विठुरायाचा सदैव आपल्या डोक्यावर आशिर्वादाचा हात राहावा आणि सगळ्यांना सुखी ठेवावे, असं साकडं विठु चरणी घातल्याचे गौतमीने सांगितले.
पंढरपुरातील कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटीलने विठ्ठलाचं दर्शन घेतलं आहे.
गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे.
'सबसे कातिल गौतमी पाटील'ची सध्या तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ आहे.
आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर प्रचंड टीका झाली.
गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात तुफान राडा, नोटांची उधळण होत असते.