Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lata Mangeshkar-Vrundavan : लतादीदी अन् निधीवनाचं खास नातं, वृंदावनाला अनेकदा लाभलाय ‘स्वरसम्राज्ञी’चा सहवास!
लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या जाण्याने केवळ संगीतविश्वावरच नाही, तर अवघ्या देशभरातील चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लतादीदींच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. वृंदावनच्या निधीवनमधील गायक जे एस आर मधुकर यांनी देखील लता मंगेशकर यांच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘स्वरसम्राज्ञी’ लता मंगेशकर आणि वृंदावनच्या निधींवनाचं एक खास नातं राहिलंय. आत्तापर्यंत त्या 40हून अधिकवेळा निधीवनमध्ये आल्या होत्या. वृंदावनला आल्यावर लतादीदी गायक जे एस आर मधुकर यांच्या घरी थांबत.
कृष्ण नगरी अर्थात उत्तर प्रदेशतील मथुरेत आल्यावर लतादीदी निधीवनमधील गायक जे एस आर मधुकर यांच्या घरी थांबायच्या. इथे येऊन त्या वृंदवनातील कृष्ण मंदिरात बसून, मीराबाईंची भजने गायच्या. तब्बल 40 वेळा त्या ठिकाणी येऊन गेल्या होत्या.
वर्षातून दोन ते तीन वेळा लतादीदींची या ठिकाणी फेरी असायची. त्या सकाळी यायच्या, तानपुरा घेऊन मीराबाईंनी रचलेली भजनं म्हणायच्या. प्रसाद ग्रहण करायच्या आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला निघायच्या.
1978पर्यंत लता मंगेशकर निधीवनमध्ये यायच्या. यानंतर कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांचं निधीवनमध्ये जाणं झालं नाही. मात्र, जे एस आर मधुकर लतादीदींसाठी खास प्रसाद घेऊन जात असत.
‘राणाजी मैं तो गिरीधर के घर जाणा..’ ही मीराबाईंची रचना लता मंगेशकर गायच्या. लतादीदींवर मीराबाईंचा विशेष प्रभाव होता. माझं नातं आता आयुष्यभरासाठी भगवान कृष्णासोबतच जोडलं गेलंय, असं त्या जे एस आर मधुकर यांच्या वडीलांशी बोलताना म्हणायच्या. ही आठवण स्वतः जे एस आर मधुकर यांनी शेअर केली आहे.