लता मंगेशकर अनंतात विलीन, अखेरचा निरोप देण्यासाठी दिग्गजांची उपस्थिती
भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 93व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ज्यानंतर सायंकाळी शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट मुंबईत पोहोचले होते.
नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील नेतेमंडळींनी देखील दिदींना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव यांचा मुलगा आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसंच पत्नी रश्मी ठाकरे यादेखील उपस्थित होत्या.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही लता दिदींना श्रद्धाजंली वाहिली.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी दिदींचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी आले होते.
नेतेमंडळीसह कला क्षेत्रातील दिग्गजही यावेळी उपस्थित होते. गायिका अनुराधा पौडवाल यांनाही यावेळी गहिवरुन आलं होतं.
बॉलिवुड अभिनेता आमिर खान आणि रणबीर सिंग यांनीही लता दिदींना आदरांजली वाहिली.
बॉलिवुड सुपरस्टार शाहरुख खान याने दिदींसाठी दुवा मागत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
शंकर महादेवन हे देखील यावेळी लता दिदींचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी आले होते.
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसोबत यावेळी उपस्थित होते.
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते-अभिनेत्री यावेळी उपस्थित होते.