Kritika Kamra: लोकप्रिय क्रिकेट होस्टसोबत नातं जाहीर करताच चाहत्यांचं लक्ष खेचलं; 'या' OTT क्विनचा, टीव्हीपासून ओटीटीपर्यंत दमदार प्रवास

कृतिकानं दोघांचे फोटो शेअर करुन आपलं नातं ऑफिशिअल केलं आहे. कृतिकानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये गौरव आणि ती दोघेही एकमेकांचे फोटो क्लिक करताना दिसत आहेत.

Continues below advertisement

Krutika kamra

Continues below advertisement
1/7
कृतिका कामरा ही टीव्हीवरून ओटीटीपर्यंत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
2/7
छोट्या पडद्यावरून अभिनयाची सुरुवात केलेली कृतिका आज ओटीटीवरील ताकदीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे.
3/7
कृतिका कामरा आणि गौरव कपूर एकमेकांना डेट करत आहेत. बुधवारी कृतिका कामरानं सोशल मीडियावर एक पोस्ट करुन दोघांचं नातं ऑफिशिअल केलं. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे.
4/7
फॅशन आणि मेडिकलचे शिक्षण सोडून कृतिकाने अभिनयाची वाट निवडली. 2007 मध्ये ‘येहाँ के हम सिकंदर’ या टीव्ही शोमधून तिने अभिनयात पदार्पण केले.
5/7
2007 मध्ये ‘येहाँ के हम सिकंदर’ या टीव्ही शोमधून तिने अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. पुढे तिने ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ अशा अनेक मालिका केल्या.
Continues below advertisement
6/7
टीव्हीव्यतिरिक्त कृतिकाने ओटीटी आणि चित्रपटांमध्येही स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.2018 मध्ये तिने ‘मित्रों’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. मात्र पुढे ती प्रामुख्याने ओटीटी प्रोजेक्ट्सकडे वळली.
7/7
कृतिका कामराची पहिली ओटीटी वेबसीरिज ‘तांडव’(2021 – Amazon Prime Video) होती, ज्यामध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली. हा तिच्या टीव्हीनंतरचा ओटीटीवरील पहिला मोठा प्रकल्प ठरला.
Sponsored Links by Taboola