Shubhangi Atre Birthday : जाणून घ्या ‘अंगुरी भाभी’बद्दलच्या 'या' खास गोष्टी!
Shubhangi Atre Birthday : 'भाबी जी घर पर हैं' या कॉमेडी टीव्ही सीरियलमध्ये एकापेक्षा एक व्यक्तिरेखा दिसतात. यामध्ये मनमोहन तिवारीच्या भूमिकेत दिसणारे रोहिताश गौर ते विभूती नारायण मिश्रा साकारणाऱ्या आसिफ शेख यांचा समावेश आहे.(PHOTO:shubhangiaofficial/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज आम्ही तुम्हाला या टीव्ही मालिकेतील अशाच एका व्यक्तिरेखेबद्दल सांगणार आहोत, हे पात्र म्हणजे अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) हिने साकारलेली ‘अंगूरी भाभी’. आज (11 एप्रिल) ‘अंगुरी भाभी’ साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी अत्रेचा वाढदिवस आहे.(PHOTO:shubhangiaofficial/IG)
शुभांगीच्या आधी मालिकेत ‘अंगुरी भाभी’ ही भूमिका अभिनेत्री शिल्पा शिंदेने साकारली होती. शिल्पाच्या जबरदस्त अभिनयामुळे तिचे 'अंगूरी' हे पात्र घराघरात प्रसिद्ध झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तिच्यानंतर ही भूमिका अभिनेत्री शुभांगी अत्रेच्या वाट्याला आली. या आधीही ‘चिडियाघर’ नावाच्या मालिकेत शुभांगीनेच शिल्पाला रिप्लेस केले होते.(PHOTO:shubhangiaofficial/IG)
एका मुलाखतीत शुभांगीने सांगितले होते की, तिला फक्त 'भाभी जी घर पर हैं'च नाही तर इतर अनेक टीव्ही सीरियल्सच्या ऑफर्सही होत्या.(PHOTO:shubhangiaofficial/IG)
शुभांगीच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीने तिला नवीन मालिका किंवा नवीन भूमिका निवडावी असे सुचवले होते. सतत एकाच प्रकारच्या भूमिकांमुळे एक ओळख तयार होते, त्यामुळे नवं काहीतरी कर, असं तिला पतीने सांगितलं होतं.(PHOTO:shubhangiaofficial/IG)
परंतु, शुभांगीच्या मनाने ‘अंगूरी भाभी’ची भूमिका निवडावी असे सांगितले आणि अशा प्रकारे या अभिनेत्रीचा या मालिकेत प्रवेश झाला. नुकतेच ‘भाभी जी घर पर हैं’ने 1700 एपिसोड पूर्ण केले आहेत.(PHOTO:shubhangiaofficial/IG)