PHOTO: रणदीपची बॉलिवूडमध्ये एन्ट्री कशी झाली?

बॉलिवूड एन्ट्रीबद्दल बोलताना रणदीप म्हणाला...

रणदीपची बॉलिवूडमध्ये एन्ट्री कशी झाली?

1/9
अष्टपैलू अभिनेता रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षी अभिनेता व्हायचं ठरवलं होतं.
2/9
फेमस होण्याच्या उद्देशाने त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
3/9
बॉलिवूड एन्ट्रीबद्दल बोलताना रणदीप म्हणाला,"लहानपणापासून अभिनेता होण्याचं माझं स्वप्न होतं. हरियाणामध्ये बालपण गेलं असल्याने गोष्टी सोप्या नव्हत्या. शाळेत असताना मी रंगभूमीसोबत जोडला गेलो. छोट्या नाटिकांमध्ये काम करत असताना या क्षेत्राबद्दल आणखी रुची निर्माण झाली".
4/9
किस्सा शेअर करत रणदीप म्हणाला,"पाच-सहा वर्षांचा असताना घराजवळ एका व्यक्तीचं निधन झालं होतं. पण तरी त्यांच्याआसपास कुटुंबातील मोजके सदस्य सोडून कोणी नव्हतं. त्यावेळी माझ्या मनात विचार आला माझं निधन होईल तेव्हा असं चित्र असता कामा नये. त्यासाठी आपण फेमस होणं गरजेचं आहे. पुढे एक दिवस वडिलांना मी अभिनेता व्हायचा विचार करत असल्याचं सांगितलं. त्यावेळी वडिलांनी सल्ला दिला की,"तुला जे करायचं ते कर पण म्हातारपणी आमच्यासाठी ओझं होऊ नको".
5/9
रणदीपने पुढे मुंबई गाठली. त्यावेळी नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांचा हात त्याने कधी सोडला नाही. 'मॉन्सून वेडिंग' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.पुढे राम गोपाळ वर्मांनी त्याला काम दिलं. विश्राम सावंत यांच्याकडून त्याने दिग्दर्शनाचं तंत्र शिकलं. सत्यपरिस्थितीवर सिनेमा बनवायला त्याला आवडतो".
6/9

7/9
रंग रसियामधली राजा रवी वर्माची भूमिका असो, सरबजीतमधल्या सरबजीतची,किंवा एका महिन्यात साडे तेरा कोटी लोकांनी पाहिलेल्या एक्सट्रॅक्शनमधल्या साजू रावची..तो मोजकेच रोल करतो पण प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ छाप सोडतो.
8/9
णदीप आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
9/9
22 मार्च 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणदीपच्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
Sponsored Links by Taboola