Photo : निधन होऊन 60 वर्षे झाली, तरी 'या' अभिनेत्रीचीच चर्चा

अभिनेत्री मर्लिन मुन्रोच्या (Marilyn Monroe) आयुष्यावर आधारित असणारा ब्लॉन्ड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिने जग सोडून 60 वर्ष झाली तरी तिची अजूनही चर्चा होत असते.

Photo : निधन होऊन 60 वर्षे झाली, तरी 'या' अभिनेत्रीचीच चर्चा

1/9
नेटफ्लिक्सवर (Netflix) 28 सप्टेंबर रोजी ब्लॉन्ड हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे कथानक हे हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यावर बेतलेले आहे.
2/9
ही अभिनेत्री म्हणजे मर्लिन मुन्रो (Marilyn Monroe) आहे. तिचे निधन होऊन 60 वर्षे उलटली तरी तिच्याबद्दल आजही चर्चा सुरू असते.
3/9
तिचा बायोपिक ब्लॉन्ड देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मर्लिनच्या चाहत्यांचे मत आहे की, ब्लॉन्डमध्ये मर्लिनची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीची बोलण्याची पद्धत ही मर्लिनसोबत जुळत नाही.
4/9
लाईट्स, कॅमेरा, फॉटोग्राफर्स आणि पत्रकार यांनी वेढलेल्या मर्लिनच्या त्या उडणाऱ्या स्कर्टच्या फोटोची चर्चा आजही होते.
5/9
4 ऑगस्ट 1962 रोजी लॉस एंजिलिस येथे मर्निनचं झालं निधन. मर्लिनच्या रुममधून आवाज येत नाही, असं मर्लिनसोबत असणाऱ्या हाऊसकिपरला 5 ऑगस्ट 1962 जेव्हा लक्षात आलं. त्या हाऊसकिपरनं मर्लिनच्या मानसोपचारतज्ज्ञाला फोन केला.
6/9
रुमची खिडकी तोडून जेव्हा हाऊसकिपर रुममध्ये गेला. तेव्हा मर्निन ही त्याला बेडवर पडलेली दिसली. तिच्या हातात टेलिफोन होता. बेडजवळ एक रिकामी बॉटल होती. मर्लिननं आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला? हे अजूनही कोणाला माहित नाही.
7/9
अनेकांचे असे मत आहे की, हाऊसकिपरला नोकरीवरुन मर्लिननं काढलं म्हणून त्यानं तिचा खून केला. मर्लिन मुन्रोचा मृत्यू हा आजही चर्चेचा विषय आहे.
8/9
मर्लिननं कॉस्मोपोलिटन आणि वोग यांच्यासोबत एक करार केला होता. तिचं शेवटचं फोटोशूट बर्ट स्टर्न यांनी केलं.
9/9
मर्लिनचं हे न्यूडफोटोशूट होते. मर्लिनच्या मृत्यूनंतर तिच्या या फोटोला द लास्ट सिटिंग असं नाव देण्यात आलं.
Sponsored Links by Taboola