Kiara Advani Pregnancy: कियारा-सिद्धार्थ होणार आई अन् बाबा; क्युट फोटोसोबत चाहत्यांना दिली गोड बातमी
Kiara Advani Pregnancy: किआरा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या घरी आता लवकरच पाळणा हलणार आहे.
Kiara Advani Pregnancy
1/8
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आई होणार आहे. अभिनेत्री कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राने शुक्रवारी इन्स्टावरुन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
2/8
बॉलिवूडचं क्युट कपल म्हणजे, किआरा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा. यांच्या घरी आता लवकरच पाळणा हलणार असून यासंदर्भात कपलनं सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
3/8
दोघेही आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार असून ही गोड न्यूज दोघांनीही इन्स्टावर पोस्ट करुन शेअर केली आहे.
4/8
किआरा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एक क्युट फोटोही शेअर केला आहे.
5/8
फोटोमध्ये दोघांच्या हातात इटुकले पिटुकले लोकरीनं विणलेले मौजे दिसत आहेत. त्यासोबत दोघांनी एक कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये "The greatest gift of our lives👼 Coming soon..."
6/8
2023 मध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. 7 फेब्रुवारीला राजस्थानमध्ये दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता.
7/8
आता लग्नाच्या दोन वर्षांनी दोघांनी चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. लवकरच दोघेही आई-बाबा होणार असून घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
8/8
सिद्धार्थ, किआराच्या पोस्टनंतर चाहत्यांकडून त्यांच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
Published at : 28 Feb 2025 03:16 PM (IST)