'Toxic' Film : 'टॉक्सिक’ मधून कियारा आडवाणीचा पहिला लुक रिलीज; जाणून घ्या फिल्म कधी होणार प्रदर्शित
टॉक्सिक’ मधून कियारा आडवाणीचा पहिला लुक रिलीज जाणून घ्या फिल्म कधी होणार प्रदर्शित
Continues below advertisement
'Toxic' Film : 'टॉक्सिक’ मधून कियारा आडवाणीचा पहिला लुक रिलीज; जाणून घ्या फिल्म कधी होणार प्रदर्शित
Continues below advertisement
1/5
Toxic Film: बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी केजीएफ फेम यश यांच्या आगामी ‘टॉक्सिक’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील कियाराचा पहिला लुक आता समोर आला आहे, ज्यात ती एक दमदार आणि प्रभावी भूमिकेत दिसत आहे.
2/5
बॉलिवूड स्टार कियारा आडवाणी, यशसोबत ‘टॉक्सिक’मध्ये लीड अभिनेत्री म्हणून झळकणार आहे. आई झाल्यानंतर ‘टॉक्सिक’ हा कियाराचा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी ती ‘वॉर 2’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. प्रेग्नन्सी आणि आई झाल्यानंतरही कियाराने कामातून कोणताही ब्रेक घेतला नाही आणि सतत शूटिंग करत राहिली. आता ती पुन्हा एकदा यशसोबत मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्याची तयारी करत आहे
3/5
पहिला लुक समोर आला ‘टॉक्सिक’मधील कियाराचा पहिला लुक समोर आला आहे, जो स्वतः यशने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. पोस्टरमध्ये कियारा स्टेजवर अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. तिच्या डोळ्यांत एक दडपलेली वेदना दिसत आहे , ज्यातून तिच्या पात्राची खोली जाणवते.
4/5
‘टॉक्सिक’मध्ये कियारा नादिया ही भूमिका साकारत आहे. कियाराचा हा लुक समोर येताच सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. तिच्या या नव्या अवताराची सर्वजण भरभरून प्रशंसा करत आहेत.
5/5
फिल्म कधी रिलीज होणार? केजीएफ स्टार यशची फिल्म ‘टॉक्सिक’बद्दल प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 19 मार्चला प्रदर्शित होणार आहे.
Continues below advertisement
Published at : 22 Dec 2025 04:34 PM (IST)