In Pics : KGF फेम अभिनेता यशने खरेदी केले आलिशान घर, पाहा गृहप्रवेशाचे फोटो
KGF
1/6
केजीएफ (KGF) चित्रपट तुम्हाला आठवतच असेल. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता यशने (Yash) आपल्या धमाकेदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर नेहमीच चर्चेत असणारा यश आज वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
2/6
अभिनेता यशने एक आलिशान घर विकत घेतेले आहे. त्याच्या या नव्या घरात पत्नीसोबत पूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
3/6
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये यश त्याच्या कुटुंबियांसोबत घराची पूजा करताना दिसत आहे.
4/6
यशच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांना घराचा फोटो खूपचं आवडला आहे. यातील अनेक चाहत्यांनी यावर कमेंट केल्या आहेत
5/6
मीडिया रिपोर्टनुसार यशने बंगळूरुमध्ये नवं घर खरेदी केले आहे. अभिनेत्री राधिका पंडित हिच्यासह यशनं विवाह केला. या लोकप्रिय सेलिब्रिटी जोडीला दोन मुलं आहेत.
6/6
यश आणि त्याची पत्नी देखील एक फाऊंडेशन चालवतात जे गरजूंना मदत करते, त्याचे नाव यशो मार्ग फाऊंडेशन (Yasho Marga Foundation) आहे.
Published at : 03 Jul 2021 09:02 PM (IST)