KGF 2, Yash : ‘केजीएफ 2’ फेम यशकडेही ‘पान मसाला’ जाहिरातीची ऑफर! पाहा अभिनेता काय म्हणाला...

Continues below advertisement

KGF chapter 2 star Yash

Continues below advertisement
1/6
कन्नड सुपरस्टार अभिनेता यश (Yash) सध्या त्याच्या 'KGF Chapter 2' चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने कमाईच्याबाबतीत ‘बाहुबली’, ‘RRR’ सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.
2/6
'KGF 2' च्या यशामुळे आणि अभिनेत्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याला अनेक ब्रँडकडून वेगवेगळ्या जाहिरातींच्या ऑफर्स मिळत आहेत. दरम्यान, यशला एका पान मसाला ब्रँडकडून जाहिरातीची ऑफरही आली आहे, ज्यासाठी त्याला करोडो रुपये मानधन देण्याचे आश्वासनही देण्यात आले.
3/6
नुकताच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या एका पान मसाला जाहिरातीवरून सोशल मीडियावर खूप ट्रोलझाला होता. मात्र, नंतर अक्षयने आपली चूक मान्य करत चाहत्यांची माफी मागितली आणि भविष्यात कधीही अशा जाहिरातींमध्ये काम न करण्याचे वचन दिले. तर, अभिनेता अल्लू अर्जुनने देखील अशी जाहिरात करण्यास स्पष्ट नका दिला.
4/6
आता ‘केजीएफ’ सुपरस्टार यशने देखील मोठे पाऊल उचलले आहे. यशने कोट्यवधी रुपये नाकारत, पान मसाला ब्रँडची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. यशला आपल्या चाहत्यांना निराश करायचे नाहीये. तसेच, समाजासाठी चूक किंवा घातक अशा गोष्टींना समर्थन द्यायचे नाहीये.
5/6
यशच्या एंडोर्समेंट डीलचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीने म्हटले की, ‘पान मसाला आणि अशा उत्पादनांचा लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे मृत्यूही होऊ शकतो. हाच विचार करून यशने या जाहिरातीला नकार देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याने चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या जेवला धोका निर्माण होईल अशा गोष्टी तो करणार नाही.’
Continues below advertisement
6/6
यशच्या या निर्णयावर त्याच्या चाहत्यांकडून आणि जगभरातील प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कलाकारांना प्रेक्षकांकडून जितके जास्त प्रेम मिळते, तितकीच जबाबदारी त्यांच्यावर येते. त्यामुळे आपल्या चाहत्यांची आणि प्रेक्षकांची काळजी करणे, हे देखील कलाकाराचे काम आहे.
Sponsored Links by Taboola