मुंबईकर चेतनची कमाल; वह्यांनी तयार केले अभिनेता यशचे मोझॅक पोट्रेट

KGF Chapter 2 रिलीज होण्याआधीच फिल्मस्टार यशच्या चाहत्यांनी अनोख्या पद्धतीने प्रेम व्यक्त केले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मोझॅक कलेत 14 विश्वविक्रम करणाऱ्या मुंबईकर चेतन राऊतच्या नेतृत्वात मालुर यश फॅन्स यांच्या मदतीने मोझॅकचा विश्वविक्रम करण्यात आला.

वह्यांच्या मोझॅक पोट्रेटमध्ये 20,700 वह्यांचा वापर करण्यात आला. लाल, पिवळा, निळा, हिरवा, काळा , पांढरा अश्या 6 रंगछटा असलेल्या या वह्या वापरल्यात
या पोट्रेटचा आकार 130 फूट लांब आणि 190 फूट रुंद आहे
हे पोट्रेट कर्नाटकमधील मालुरच्या व्हाईट गार्डन मैदानात 25 650 वर्ग फूट मध्ये पसरला आहे.
पोट्रेट प्रदर्शन पूर्ण झाल्यावर ह्या मधील प्रत्येक वह्यांचे वाटप शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात येणार असल्याची माहिती चेतन राऊत यांनी दिली.
हे पोट्रेट पूर्ण करण्यासाठी चेतन राऊत सोबत सुपरस्टार यशचे मालुरमधील २० चाहत्यांनी सहभाग घेतला होता. या सगळ्यांनी मिळून अवघ्या 2 दिवसात ही कलाकृती पूर्ण केली.