कतरिना कैफ किती शिकली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे (Katrina Kaif) नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलाखो चाहते कतरिनाच्या सौंदर्यावर आणि तिच्या स्टाईलवर घायाळ होतात. पण, सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी कतरिना कैफ किती शिकली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
आपण अनेकदा कतरिना कैफला चित्रपटांमध्ये अस्खलित इंग्रजी बोलताना ऐकले असेल.
पण तुम्हाला माहित आहे का की, सर्वांच्या मनावर राज्य करणारी कतरिना कधीच शाळेत गेली नाही.
कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) हे काश्मिरी वंशाचे ब्रिटिश व्यापारी होते, तर आई सुझान या देखील ब्रिटिश आहेत.
कतरिना कैफचे बालपण जवळपास 18 देशांमध्ये गेले. कतरिना कैफ सतत प्रवासामुळे कोणत्याही शाळेत जाऊ शकली नाही. मात्र, तिला शिकवण्यासाठी होम ट्यूटर नियुक्त केले गेले होते, जे तिला शिकवण्यासाठी घरी यायचे. कतरिनाने वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. काही वर्षांनी कतरिना मुंबईत आली आणि तिने येथेही आपले मॉडेलिंग करिअर सुरू ठेवले. अभिनेत्री म्हणून ती तिच्या करिअरमध्ये हळूहळू पुढे जात होती आणि अनेक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. (all photo: Katrinakaif/ig)