PHOTO : हातात हात घालून भारतात परतले बॉलिवूडचे ‘लव्हबर्ड्स’! विक्की-कतरिनाच्या हटके स्टाईलने वेधलं लक्ष

विकी कौशल आणि कतरिना कैफ रविवारी रात्री उशिरा सुट्टीवरून परतले आणि मुंबई विमानतळावर स्पॉट झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यादरम्यान या जोडीने एकमेकांचे हात धरलेले दिसले. त्याचवेळी त्यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुट्टीचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

विकी कौशल अगदी कॅज्युअल शर्ट आणि पँटमध्ये दिसला, तर हिरव्या रंगाच्या पोशाखात कॅटरिनाचा फंकी लूक देखील अप्रतिम दिसत होता.
या आठवड्यात विकी आणि कतरिना लग्नानंतर दुसऱ्या ‘मिनी हनीमून’ला गेले होते. जिथून त्याने काही खास फोटोही शेअर केले आहेत.
मात्र, दोघांनीही त्यांचे हॉलिडे डेस्टिनेशन सांगितले नाही. पण हे ‘बीच लव्हर’ जोडपे समुद्रकिनारी सुट्टी संपवून परतले आहे.
आता दोघांचा हा एअरपोर्ट लूकही चांगलाच व्हायरल झाला आहे. कतरिना आणि विकीची ही स्टाईल त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. (Photo : @katrina_kaif_kaushal09/IG)