Kartiki Gaikwad : "अहोरात्र मेहनत घेणारे मुख्यमंत्री"; कार्तिकी गायकवाडने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मानले आभार
Kartiki Gaikwad : कार्तिकीने नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
Kartiki Gaikwad
1/10
'सा रे ग म प' लिटल चॅम्प्सच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली गायिका कार्तिकी गायकवाड सध्या चर्चेत आहे.
2/10
कार्तिकीने नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
3/10
कार्तिकी आणि तिच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत ज्ञानेश्वर माऊली यांची फ्रेम भेट म्हणून दिली आहे.
4/10
कार्तिकीच्या बाबांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा कंठ संगीत पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे शासनाप्रती कृतज्ञता म्हणून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
5/10
कार्तिकीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यानचे फोटो शेअर करत लिहिलं आहे,"महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहात रात्री 2-3 वाजेपर्यंत आपण लोकांना भेटता हे काल प्रत्यक्ष पाहिले".
6/10
कार्तिकीने पुढे लिहिलं आहे,"एक व्यक्ती म्हणुन आपल्याविषयीचा आदर आणखी द्विगुणीत झाला. आपल्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा".
7/10
'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकी गायकवाडचा मोठा चाहतावर्ग आहे.
8/10
कार्तिकीने आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे.
9/10
'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स'च्या पहिल्या पर्वाची कार्तिकी गायकवाड विजेती ठरली होती.
10/10
कार्तिकीचं 'घागर घेऊन' हे गाणं खूपच लोकप्रिय ठरलं होतं.
Published at : 16 Jun 2023 04:04 PM (IST)