Shehzada : कार्तिक आर्यनच्या 'शहजादा'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात!

Shehzada : शहजादा सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली आहे.

Shehzada

1/10
बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यनचा 'शहजादा' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
2/10
एकीकडे शाहरुखचा 'पठाण' हा सिनेमा धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे 'शहजादा'ची संथ सुरुवात झालेली आहे.
3/10
कार्तिक आर्यन आणि कृती सेननचा 'शहजादा' हा सिनेमा 17 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
4/10
'शहजादा' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली आहे.
5/10
महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'शहजादा' या सिनेमाने 7 कोटींची कमाई केली आहे.
6/10
'शहजादा' हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुण्ठपुरामुलू' या दाक्षिणात्य सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.
7/10
85 कोटींच्या बजेटमध्ये 'शहजादा' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
8/10
'शहजादा' हा रोमॅंटिक सिनेमा असला तरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात मात्र कमी पडला आहे.
9/10
एकीकडे 'पठाण' सारखा सिनेमा असताना 'शहजादा' हा पाहावा असा प्रश्न सिनेरसिक उपस्थित करत आहेत.
10/10
शाहरुखच्या 'पठाण'चा कार्तिक आर्यनला चांगलाच फटका बसणार आहे.
Sponsored Links by Taboola