PHOTO: कार्तिक आर्यन अजूनही त्याची कमाई आईकडे देतो, अभिनेता म्हणतो..

Kartik Aaryan

1/10
बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) मोठा चाहतावर्ग आहे.
2/10
12 वर्षांपूर्वी इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या कार्तिकला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
3/10
पण आता तो बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता असून इंडस्ट्रीतील सर्वांचा लाडका आहे. अभिनेता यशस्वी झाला की स्टारडम येण्यासोबत मोठ्या प्रमाणात पैसे यायलाही सुरुवात होते.
4/10
पण कार्तिकने मात्र पैसे सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या आईकडे दिली आहे.
5/10
नेटफ्लिक्सच्या एका सिनेमाचं कार्तिकने दहा दिवस शूटिंग केलं होतं. त्याचे त्याला 20 कोटी रुपये मिळाले होते. कार्तिक आर्यन सिनेमे, इवेंट्स, प्रमोशन आणि जाहीरातींच्या माध्यमातून चांगलीच कमाई करतो.
6/10
पण त्याच्याकडे किती पैसे आहेत हे अभिनेत्याला माहीत नाही. पैसे सांभाळण्याची आणि हिशोब ठेवण्याची जबाबदारी कार्तिक आर्यनने त्याच्या आईकडे दिली आहे.
7/10
कार्तिक आर्यन नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला,"माझे पैसे सांभाळण्याची जबाबदारी आईकडे आहे. माझ्या अकाऊंटमध्ये किती पैसे आहेत हे मला माहिती नाही. पण मला माझ्या आईचा अभिमान वाटतो. माझी आई डॉक्टर आहे. पण आता तिने माझ्यासाठी काम सुरू केलं आहे. मी झोकून काम करतोय, असं तिला वाटतं".
8/10
कार्तिक पुढे म्हणाला,"माझी आई मला खर्च करण्यासाठी पॉकेट मनी देते. एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करण्यासाठी मला आईची परवानगी घ्यावी लागते. माझ्या वाढदिवसाला मला कार विकत घ्यायची होती. पण आईने कारवर पैसे खर्च करण्यास स्पष्ट नकार दिला. माझे पैसे आई सांभाळते आणि हिशोबही ठेवते त्यामुळे मला तिचं ऐकावं लागतं. अनेकदा मला या गोष्टीचा राग येतो. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतरही आईचा फोन येतो".
9/10
कार्तिक आर्यनच्या आईला त्याच्या स्वभावाची भीती वाटते.
10/10
अभिनेता पैशांचा चुकीच्या पद्धतीने वापर करेल, असा त्याच्या आईचा अंदाज आहे. याबद्दल खुलासा करत अभिनेता म्हणाला,"पैसे आई सांभाळण्याआधी मी काम कमी केलं आहे आणि खर्च जास्त केला आहे. त्यामुळे आजही आई मला पॉकेट मनी देते".
Sponsored Links by Taboola